कौन बनेगा नया नगरसेवक… मनपा पोटनिवडणुकीसाठी 45 टक्के मतदान; आज मतमोजणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कौन बनेगा नया नगरसेवक… मनपा पोटनिवडणुकीसाठी 45 टक्के मतदान; आज मतमोजणी

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेना-राष्ट्रवादीचे सुरेश तिवारी की भाजपचे प्रदीप परदेशी…यापैकी कोणी की अन्य तीन उमेदवारांपैकी म्हणजे पोपट पाथरे, ऋषिकेश गुंडला

बोठे दाम्पत्याकडे बेनामी संपत्ती?…चौकशीची मागणी
 बिबट्याच्या हल्ल्यात शेळीचे दोन करडं ठार
डीजेमुळे मराठमोळ्या सणांची प्रतिष्ठा कमी : आ. सत्यजित तांबे

अहमदनगर/प्रतिनिधी : शिवसेना-राष्ट्रवादीचे सुरेश तिवारी की भाजपचे प्रदीप परदेशी…यापैकी कोणी की अन्य तीन उमेदवारांपैकी म्हणजे पोपट पाथरे, ऋषिकेश गुंडला व संदीप वाघमारे यांच्यापैकी कोणी…कौन बनेगा नगर मनपा का नया नगरसेवक?, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी (21 डिसेंबर) उत्साहात मतदान झाल्यावर बुधवारी (22 डिसेंबर) सकाळी 11 वाजता मतमोजणीतून नवा नगरसेवक कोण असेल, हे स्पष्ट होणार आहे. मनपाच्या प्रभाग 9 (क) पोटनिवडणुकीत सुमारे 45 टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणुकीत शिवसेना व भाजप उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली असून, मनसेच्या उमेदवारानेही दुपारनंतर निवडणुकीत काही प्रमाणात रंगत आणली. निवडणुकीदरम्यान मोठया प्रमाणात ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याची चर्चा असून, मनसेच्या इंजिननेही ’धूर’ केल्यामुळे निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या पोटनिवडणुकीची आज (दि.22) मतमोजणी होणार आहे. शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द झाल्याने त्या रिक्त जागेसाठी सहा उमेदवारांमध्ये लढत झाली. अर्थात मतपत्रिकेवर सहा उमेदवारांची नावे असली तरी अजय साळवे या उमेदवाराने शिवसेनेच्या तिवारींना पाठिंबा दिला होता. तरीही त्यांचे नाव मतपत्रिकेत असल्याने त्यांना किती मते पडतात, हे पाहणेही उत्सुकतेचे आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह तीन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सुरेश तिवारी (शिवसेना), प्रदीप परदेशी (भाजप),पोपट पाथरे (मनसे), अजय साळवे, ऋषीकेश गुंडला, संदीप वाघमारे (अपक्ष) हे निवडणूक लढवित असून त्यांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. दिवसभरात सुमारे 44.61 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

सकाळी होती गर्दी
सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी झाली होती. त्यानंतर मतदान केंद्रावरील गर्दी घटली. या प्रभागात तोफखाना, सिध्दार्थनगर व दिल्लीगेट परिसराचा समावेश आहे. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे या निवडणुकीतही जोरदार लक्ष्मीदर्शन झाल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना व भाजपकडून विजयाचे दावे होत असले तरी, मनसेच्या उमेदवाराबाबत मागील निवडणुकीत आलेल्या अनुभवामुळे या निवडणुकीच्या निकालाबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. 24 मतदान केंद्रांपैकी संबोधी विद्यालय अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषीत करण्यात आल्याने त्याठिकाणी पोलिसांकडून कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. इतर मतदान केंद्रांवरही चोख बंदोबस्त होता. निवडणूक शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी सकाळी 9 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

COMMENTS