Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फेडरेशन सोसायटीच्या संचालकपदी राहुल महाडिक बिनविरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि, पुणे या संस्थेच्या संचालक पदी राहुल महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आल

शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्‍नांची सकारात्मक पध्दतीने सोडवणुक होण्याची अपेक्षा -बाबासाहेब बोडखे
सोनं महागले; पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर
प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीस भीषण आग

इस्लामपूर / प्रतिनिधी : फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि, पुणे या संस्थेच्या संचालक पदी राहुल महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोबले यांनी केली.
फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसा लि. पुणे या संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडीसाठी गुरुवार, दि. 17 डिसेंबर रोजी सर्वसाधारण विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र, या सभेस सकाळी 11 वाजेपर्यंत गणसंख्या पूर्ण न झाल्यामुळे ही सभा स्थगित करण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सोबले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी सभा त्याच दिवशी सकाळी साडेअकरा वाजता होणार असल्याचे सांगत सभेस गणसंख्या पूर्तीची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे साडेअकरा वाजता सभेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले.
निवडणूक कार्यक्रमात 3 डिसेंबर ते 6 डिसेंबर रोजी पर्यंत 21 अर्ज वितरण करण्यात आले. त्यापैकी 6 डिसेंबर अखेर एकूण 21 अर्ज प्राप्त झाले. नामनिर्देश छाननी करून 21 अर्ज पात्र करण्यात आले. दि 8 डिसेंबरपर्यंत 4 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतले. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर 17 उमेदवार शिल्लक राहिल्याने व संस्थेच्या पोट नियमानुसार सभासदांनी निवडून देण्याच्या एकूण संचालक मंडळ संख्या 17 असल्याने या 17 उमेदवारांना बिनविरोध संचालक मंडळ म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी घोषित केले.
नूतन संचालक म्हणून निवडून आलेले सौ. धनलक्ष्मी हजारे, सौ. सुलभा गुंड, राहुल महाडिक, सुरेश वाबळे, विठ्ठल वाडगे, विरुपाक्ष पाटील, जितेंद्र जैन, मगराज राठी, कडुभाऊ काळे, मारुतीराव कंठेवाड, जयसिंह पंडित, नारायण खांडेकर, रवींद्र कानडे, अशोक ओव्हाळ, सुकुमार पाटील, रोहन देशमुख, दिलीपसिंह भोसले असे आहेत.

COMMENTS