20 लाखाचे आमीष दाखवून 17 लाखाला घातला गंडा…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

20 लाखाचे आमीष दाखवून 17 लाखाला घातला गंडा…

अहमदनगर/प्रतिनिधी : बांधकाम व्यावसायिकास 20 लाखांचे आमीष दाखवून 17 लाखांना गंडा घालण्याची घटना नगरमध्ये घडली आहे. कामाच्या निविदेच्या नावाखाली ही फसव

अहमदनगरच्या जिल्हा नामातरांचा निर्णय आजच्या बैठकीत घ्या
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू
आम्ही श्रेयवादाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो ः मा.आ. कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी : बांधकाम व्यावसायिकास 20 लाखांचे आमीष दाखवून 17 लाखांना गंडा घालण्याची घटना नगरमध्ये घडली आहे. कामाच्या निविदेच्या नावाखाली ही फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल विठ्ठल चव्हाण व रमेश कोते अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संतोष वसंत दोमल (रा. सातभाई गल्ली, तोफखाना) यांनी फिर्याद दिली आहे. दोमल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अतुल चव्हाण याने सन 2015-16 मध्ये श्रीसाईबाबा संस्था या संस्थेच्या द्वारावती भक्तनिवास व शैक्षणिक इमारतीच्या रंगकामाच्या निविदा आपण एकत्रित भरू. त्यातून प्रत्येकी 20 लाख रुपये मिळतील. निविदा भरल्यानंतर रमेश कोते बिल काढण्यासाठी मदत करणार आहेत, असे सांगितले. चव्हाण याच्यासोबत भागीदारी पत्र करून 9 सप्टेंबर 2015 ते 6 नोव्हेंबर 2015 दरम्यान वेळोवेळी चेकने 11 लाख व रोख स्वरूपात सहा लाख रुपये दिले. चव्हाण याने ही रक्कम वापरली. निविदांची बिले काढून पैसे आज देतो, उद्या देतो, असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली व 17 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दोमल यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

कामरगावात भरदिवसा दीड लाखाची चौरी
नगर तालुक्यातील कामरगावात अज्ञात चोरट्यांनी निवृत्त सैनिकाच्या घरात भरदिवसा चोरी करत तब्बल 6 तोळे सोन्यासह दीड लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी सुरेश साहेबराव आंधळे (वय 43, रा.कामरगाव, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. आंधळे यांच्या घराच्या सेफ्टी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले पैसे व दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

COMMENTS