सांडव्याच्या स्वामी मठात आज दत्त जयंती ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांडव्याच्या स्वामी मठात आज दत्त जयंती ; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील सांडवे परिसरातील स्वामी समर्थ मठात शनिवारी (18 डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. सुमारे

ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यावरील बाभळीच्या काट्या काढण्याची ठाकरे गटाची मागणी
भाडोत्री दिलेली रिक्षा पळवली
सैनिक बँकेतील सभासद वाढ बेकायदेशीर; सहकार मंत्र्याकडून पूर्ण चौकशी होईपर्यंत स्थगिती

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील सांडवे परिसरातील स्वामी समर्थ मठात शनिवारी (18 डिसेंबर) सायंकाळी सहा वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. सुमारे 15 वर्षांपासून होणारा या स्वामी मठातील दत्त जन्मोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. त्यामुळे शनिवारी होणार्‍या या सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होताना कोरोना नियमावलीचे पालन करण्याचेही आवर्जून सांगण्यात आले आहे. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात व सांडवे परिसरात स्वामी समर्थ मठ प्रसिद्ध आहे. नवनाथांतील मच्छिंद्रनाथांचे विश्रांती स्थान म्हणूनही हा परिसर प्रसिद्ध आहे. त्यामुळे चैतन्यमयी वातावरणातील या मठात असलेल्या स्वामी समर्थ मूर्तीच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक नियमितपणे येत असतात. वर्षभर येथे विविध सणांच्या काळात धार्मिक कार्यक्रम होतात. दर गुरुवारी सायंकाळी होणार्‍या महाआरतीसही भाविकांची गर्दी असते. मागील दीड वर्षांपासून कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे भाविकांसाठी दर्शन निर्बंध करण्यात आले होते. मात्र, आता कोरोनाचे सावट कमी होत असल्याने व राज्यातील सर्वच धार्मिक स्थळे उघडून तेथे दैनंदिन पूजाअर्चा व नियमित उत्सव सुरू झाल्याने सांडव्याच्या स्वामी समर्थ मठातही शनिवारी दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात होणार आहे.

पालखी-प्रवचन व भंडारा
दत्त जन्मोत्सवानिमित्त शनिवारी (18 डिसेंबर) दुपारी 3 वाजता भजन गायन होणार असून, त्यानंतर दुपारी 4 वाजता स्वामी समर्थ मठात पालखी मिरवणूक निघणार आहे. दत्त नाम व स्वामी समर्थ नामघोष करीत परिसरात ती फिरणार असून, त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मठात दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. त्यानंतर हरिभक्त परायण निमसे महाराज यांचे प्रवचन होणार आहे. यावेळी महाप्रसाद-भंडाराही होणार आहे. भाविकांनी या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नगरमध्येही दत्त जन्मोत्सव
नगर शहरातील दत्त मंदिरांतून तसेच अन्य मंदिरांतूनही शनिवारी सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दिल्लीगेट येथील नाना महाराज मठात यानिमित्त हरिनाम सप्ताह सध्या सुरू आहे. माणिक चौकातील एकमुखी दत्त मंदिर, चौपाटी कारंजावरील नगरकरांचे दत्त मंदिर, पाईपलाईन रस्त्यावरील अहिल्यानगरीतील वरद दत्तात्रय मंदिर तसेच नगर-मनमाड महामार्गावरील वेदान्तनगर दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. यानिमित्त या मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

COMMENTS