रत्नागिरी : गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असून, राज्य सरकारने वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर देखील जोपर्यंत महामंडळ विलीनीकर
रत्नागिरी : गेल्या दीड महिन्यापासून एसटी कर्मचार्यांचा संप सुरूच असून, राज्य सरकारने वेतनवाढीचा प्रस्ताव ठेवल्यानंतर देखील जोपर्यंत महामंडळ विलीनीकरणाचा निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याच्या इशार्यावर संपकरी ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकार लवकरच निलंबित कर्मचार्यांना बडतर्फ करण्याच्या विचाराधीन असल्याचा इशारा परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
राज्य सरकार हातावर हात ठेवून बसू शकत नाही, त्यामुळे कृती करावीच लागेल, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. एसटीचे 10 हजारपेक्षा अधिक कर्मचारी निलंबित झाले आहेत. अडीच हजारापेक्षा अधिक रोजंदारीवरील कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. प्रशासन कारवाईचे एक एक पाऊल पुढे टाकत आहे. जे निलंबित झालेत त्यांची बडतर्फी होऊ शकते. सरकारला अशी कारवाई करण्याची बिलकूल इच्छा नाहीये. परंतु लोकांना वेठीला धरून अत्यावश्यक सेवा वेठीला धरली जात असेल तर सरकारही हातावर हात ठेवून बसणार नाही. सरकार सर्व पर्यायांचा विचार करत आहे. ते वापरावे लागतील, असे परब यांनी सांगितले.
एसटी कर्मचार्यांना मेस्मा लावणार की नवी नोकर भरती करणार? यावर बोलतांना परब म्हणाले की, एसटीच्या सेवेत आतापर्यंत 22 हजार कर्मचारी परत आले आहेत. एसटीची 125 डेपोत वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात बर्यापैकी वाहतूक सुरू आहे. तर विदर्भ मराठवाड्यात कमी प्रमाणात वाहतूक सुरू आहे. 20 तारखेनंतर हळूहळू वाहतूक सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 20 तारखेला विलनीकरण करून दाखवतो अशी हमी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कर्मचार्यांना दिली आहे. कशाच्या जोरावर त्यांनी हमी दिली माहीत नाही. कोणत्या कायद्यांतर्गत दिली तेही माहीत नाही. परंतु कामगारांची दिशाभूल सुरू आहे. कामगार भरकटले आहेत. यात कामगार आणि एसटीचे नुकसान होत आहे. सदावर्तेंचे होत नाही. यात कामगार भरडले जात आहे. गेले दीड महिना ते कामावर नाहीत. त्यांचा पगार गेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
COMMENTS