राज्य सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यास यशस्वी ; मुंबई उच्च न्यायालयाची कौतुकाची थाप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यास यशस्वी ; मुंबई उच्च न्यायालयाची कौतुकाची थाप

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना काळात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली असल्याचा दावा करत विरोधकांनी ठाकरे सरकारव

बबनराव घोलप यांची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी
ब्रम्हवाडी गावात विकासाची गंगा – धनंजय मुंडे
राजेश टोपे यांचा इशारा, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास…. | LOKNews24

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना काळात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली असल्याचा दावा करत विरोधकांनी ठाकरे सरकारवर टीकची झोड उठवली आहे. मात्र कोरोना संकट हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी राहिला असल्याची कौतुकाची थाप मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे.
यापूर्वी मुंबईसह राज्यातील रूग्णालयांत खाटांची कमतरता, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा या प्रश्‍नांवरही हायकोर्टात सुनावणी झाली होती. त्यावर सुनावणीवेळी या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत हायकोर्टाने राज्य सरकारला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या प्रयत्नांचे राज्यातील इतर महापालिकांनीदेखील अनुकरण करावे, अशा सूचनाही एका सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने केली होती. विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने राज्यातील रुग्णसेवा कोलमडली असून, कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप केला होता. शिवाय राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधाविरोधात देखील ओरड होत होती. मात्र कोरोना संकटाचा सामना करण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी राहिल्याचे कोर्टाने म्हटले आहे. मुंबई हायकोर्टात कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. यावेळी कोरोनाकाळातील विविध समस्यांबाबत दाखल याचिका हायकोर्टाने निकाली काढण्यात आल्या.

COMMENTS