Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोव्याहून राजस्थानच्या दिशेने जाणार्‍या खाजगी बसला भीषण अपघात; बसमधील चालकासह सहाजण जखमी

शिराळा / प्रतिनिधी : ओम शांती कंपनीची खाजगी बस गोव्याहून राजस्थानच्या दिशेने जात होती. बसमधील सर्व प्रवासी आचारी काम करणारे मजूर होते. कालुसिंग ह

दागिने पॉलिश करून देण्याचा बनाव करून पाच तोळे सोने लंपास
18 वी आंतर जिल्हा मैदानी अजिंक्यपद निवड स्पर्धा उत्साहात
शिराळा येथे चारचाकी व मोटरसायकल अपघात; एक जखमी तर एक मयत

शिराळा / प्रतिनिधी : ओम शांती कंपनीची खाजगी बस गोव्याहून राजस्थानच्या दिशेने जात होती. बसमधील सर्व प्रवासी आचारी काम करणारे मजूर होते. कालुसिंग हलवायी या कॅटरींग व्यवसाईकाने हे काम घेतले होते. गोवा येथील लग्न समारंभाचे काम आटपून रत्नागिरी-आंबा घाट-मलकापूर- शेडगेवाडी फाटा मार्गे गिव (राजस्थान) येथे परत जात होते. बस मेणी फाटा, ता. शिराळा येथे आली असता बसचा चालक राजूसिंग राजपूत याने बस भरधाव वेगाने व बेजबाबदारपणे चालवल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटुन लोखंडी संरक्षक ग्रील तोडून मेणी ओढ्याच्या पुलावरून ही बस खाली कोसळली. बस पलटी होऊन हा अपघात झाला.
अपघातात एकूण सहाजण किरकोळ व गंभीर स्वरूपात जखमी झाले आहे. बसचे अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जखमींना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मेणी फाटा येथे बस थांब्यापासून शंभर मीटर अंतरावर शेडगेवाडी कराड जाणार्‍या महामार्गावरील पुलाचे संरक्षक लोखंडी ग्रील तोडून ही बस 10 ते 15 फूट खोल खाली कोसळुन पलटी झाली. ही माहिती पोलिसांना मिळताच तातडीने कोकरुड पोलीस घटनास्थळी हजर होऊन जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी चारजणांची प्रकृती गंभीर व चिंताजनक आहे. गुन्ह्याची फिर्याद ताराचंद रामनिवास साहू (वय 35, रा. पिसा गण, जि. अजमेर, राजस्थान) यांनी कोकरुड पोलिसात दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शिवाजी जाधव करत आहेत.

COMMENTS