कर्जत पंचायत समितीतील वाढीव बांधकामासाठी पावणेचार कोटींचा निधी : आ. रोहित पवार

Homeमहाराष्ट्र

कर्जत पंचायत समितीतील वाढीव बांधकामासाठी पावणेचार कोटींचा निधी : आ. रोहित पवार

आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कर्जत पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम आता होणार आहे.

नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी
अकोले शहरात विविध उपक्रमांनी श्रीराम नवमी उत्साहात साजरी
गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांचा सेवापूर्ती सोहळा

कर्जत/प्रतिनिधी : आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न आणि पाठपुराव्यातून कर्जत पंचायत समितीच्या तळमजला इमारतीवर पहिल्या मजल्याचे प्रशस्त बांधकाम आता होणार आहे. पंचायत समितीच्या पहिल्या मजला बांधकामास व इतर उपकामास मंजुरी मिळाली असुन या कामासाठी सुमारे ३ कोटी ८८ लक्ष ६० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. 

कर्जत पंचायत समितीचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आलेले आहे. वेगवेगळ्या विभागांची कामे सध्या याच तळमजल्याच्या इमारतीत पार पडतात. मात्र पंचायत समितीच्या कामाचा आणि विविध विभागाचा आवाका पाहता सध्या कार्यान्वित असलेली जागा अपुरी पडत आहे.आता या नियोजित पहिल्या मजल्याचे बांधकाम तळमजल्याच्या इमारतीवर करण्यात येणार आहे. तळमजल्यात महिला पदाधिकाऱ्यांसाठी प्रसाधनगृहासह विश्रांती कक्षाची व्यवस्था करण्यात आली नसल्याने तशी व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात येणार आहे. या बांधकामात ग्रीन संकल्पना, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायूवीजन, पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जास्तीत जास्त पर्यावरणपुरक बांधकाम साहित्य व साधनसामग्रीचा वापर करण्यात येणार आहे. पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याचे ६९८.९० चौ.मी. क्षेत्रफळाचे बांधकाम प्रस्तावित केलेले आहे. प्रशासकीय कार्यालयांचा आ.पवार यांच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने होत असलेला कायापालट नागरिकांच्या अडचणी एकाच छताखाली सोडवण्यासाठी फायद्याचा ठरणार आहे.

COMMENTS