Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांसमवेतच्या आढावा बैठकीत रूसा अंतर्गत २६.५१ कोटी अनुदानाचे वाटप

मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांच्या समवेत आढावा बैठकीत रूसा अंतर्गत 26.51 कोटी अनु

कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा
कोरेगाव न्यायालयासाठी 60 लाखांचा निधी मंजूर
राजारामबापू साखर कारखान्यामार्फत सभासद शेतकर्‍यांना फळझाडांचे वाटप

मुंबई, दि. 7 : राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान अंतर्गत रूसा सहभागी विद्यापीठे व महाविद्यालयांच्या समवेत आढावा बैठकीत रूसा अंतर्गत 26.51 कोटी अनुदानाचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत रूसा अंतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. रूसा अंतर्गत अपुर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण करून कामाची गुणवत्ता राखणे तसेच पारदर्शकता ठेवण्याबाबत विद्यापीठ व महाविद्यालयांना आवाहन करण्यात आले.

नवीन शैक्षणिक धोरण, महाविद्यालयीन स्वायत्ता या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित प्राचार्य व प्रतिनिधीना मार्गदर्शन करण्यात आले. रूसा अंतर्गत प्राप्त शैक्षणिक उपकरणांचा इतर महाविद्यालये व विद्यार्थी यांना देखील लाभ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना यावेळी करण्यात आल्या. रूसा 3.0 अंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कामे हाती घ्यावी. तसेच सर्व महाविद्यालय व विद्यापीठ यांनी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेसोबत सहभागी होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

COMMENTS