विखेंचा आज थोरातांच्या गावात मोर्चा…वीज बिल वसुलीचा निषेध

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विखेंचा आज थोरातांच्या गावात मोर्चा…वीज बिल वसुलीचा निषेध

अहमदनगर/प्रतिनिधी : थकीत वीज बिलांच्या कारणावरून शेतीपंपाचा वीज पुरवठा तोडण्याच्या सुरु असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिर्डीचे आमदार व माजी विरोधी पक

हे तर पळ काढण्यासाठी बळ वापरणारे सरकार…भाजपचा ठाकरे सरकारवर ठपका
लहान मुलांवर कोरोना लसीची बारामतीत चाचणी
अपहरण करून व पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : थकीत वीज बिलांच्या कारणावरून शेतीपंपाचा वीज पुरवठा तोडण्याच्या सुरु असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ शिर्डीचे आमदार व माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (6 डिसेंबर) महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या संगमनेर गावातील महावितरण कार्यालयावर एल्गार मोर्चा नेण्यात येणार आहे.
थकीत वीज बिलांच्या कारणाने शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर सोमवारी सकाळी 10 वाजता शेतकर्‍यांचा एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपाच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे यांनी दिली. भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटनमंत्री नितीन दिनकर, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनील वाणी यांच्या उपस्थितीत या शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तीनबत्ती चौकातून या मोर्चास प्रारंभ होणार असून, शहरातील प्रमुख मार्गावरुन वीज वितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार आहे.
कोविड संकटानंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्‍यांना कोणतीही मदत झालेली नाही. उलट शेतकर्‍यांचे उत्पन्नही घटल्याने वीज बिल शेतकरी भरु शकत नाहीत, ही वस्तुस्थिती असताना वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांना वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसाच पाठवून अन्याय केला आहे. ऐन रब्बी हंगामात शेतीची कामे सुरु असताना शेती पंपाचा वीज पुरवठा खंडीत केला जात असल्याने शेतकर्‍यांची दुहेरी अडचण सरकारने केली असल्याचा आरोप कानवडे यांनी केला. सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी या एल्गार मोर्चाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चाचे नियोजन तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहर अध्यक्ष श्रीराम गणपुले, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, तालुकाध्यक्ष शैलेश फटांगरे, शहर अध्यक्ष दिपेश ताटकर, राम जाजू, सुधाकर गुंजाळ, राजेश चौधरी, राजेंद्र सांगळे यांनी केले आहे.

COMMENTS