मुंबई/पुणे : राज्यात काल कल्याण-डोंबवलीमध्ये ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा, तर पुण्यात एक आणि धारावी
मुंबई/पुणे : राज्यात काल कल्याण-डोंबवलीमध्ये ओमायक्रॉनच्या व्हेरियंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी पिंपरी चिंचवडमध्ये सहा, तर पुण्यात एक आणि धारावीमध्ये एक रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यात ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 8 वर पोहचली आहे. आज आढळलेल्या सात रुग्णांमध्ये पिंपरमध्ये सहा तर पुण्यातील एक रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे डोंबिवली पाठोपाठ आता पुणे व पिंपरीत देखील ओमायक्रॉनचा शिरकाव झालेला आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा नवा व्हिरियंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला असून, धारावीत पहिला बाधित रूग्ण आढळला आहे. बाधित व्यक्ती टांझानियातून परतली आहे. त्या रूग्णाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची प्रशासनातर्फे माहिती घेण्याचे काम सुरू आहे. देशात हळूहळू कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. सध्या देशभरात एकूण ओमायक्रॉनचे सहा रूग्ण झाले असून, दिल्ली, गुजरात मध्ये प्रत्येकी एक तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात प्रत्येकी दोन अशी संख्या झाली आहे. काल महाराष्ट्रात सापडलेला डोंबिवलीमध्ये राहणारा 33 वर्षीय पहिला रूग्ण, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत दाखल झाला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बारा अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि 23 कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. दिल्ली ते मुंबई विमान प्रवासात या तरुणाच्या 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत.
दरम्यान, ओमिक्रॉनचा धोका वाढल्यानंतर राज्य सरकारसह स्थानिक प्रशासन सर्तक झाले आहे. ओमिक्रॉनचा रुग्ण भारतात आढळल्यापासून कोरोनाचे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. ओमीक्रॉनचा व्हेरियंट येण्यापूर्वी जिल्हापालक मंत्री आजित पवार यांनी पुण्यात व बैठक घेत शहरातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी पुण्यातील चित्रपटगृहांसह , नाट्यगृह सुरु तसेच सांसकृतिक कार्यक्रम पूर्ण क्षमतेने आयोजित कराण्यास परवानगी दिली होती. त्यासाठी कोरोनाचे आवश्यक ते निर्बंध पाळण्यासही त्यांनी सांगितले होते. मात्र त्यांनंतर भारतात ओमीक्रॉनचा रुग्ण सापडल्याने राज्य सरकारने कोरोनाच्या नियमावलीत बदल केले. त्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आले.
COMMENTS