Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रपती रायगड दौर्‍यानिमित्त हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती गडावर ’रोप वे’ ने जाणार

रायगड / प्रतिनिधी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्त गडावर हेलिपॅड बनविण्यास झालेल्या विरोधामुळे राष्ट्रपती र

वीज यंत्रणेवरील स्थानिक कर आकारणीतून महावितरणला सूट
तडवळे येथील शिवकालीन ऐतिहासिक गडी नामशेष होण्याच्या मार्गावर
एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर

रायगड / प्रतिनिधी : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड दौर्‍यावर येत आहेत. यानिमित्त गडावर हेलिपॅड बनविण्यास झालेल्या विरोधामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रोप वे ने रायगडावर जाण्याचे जाहीर केले आहे, अशी माहिती राज्य सभेचे खा. छ. संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.
हिंदुस्थान शिवप्रतिष्ठान, आ. भरत गोगावाले यांच्यासह अन्य संघटनांनी होळीच्या माळावरील हेलिपॅडला विरोध केला होता. राष्ट्रपतींच्या नियोजित दौर्‍यासाठी रायगडासह पाचाड आणि अन्य ठिकाणी सात हेलिपॅड तयार करण्यात आली होती. मात्र, होळीच्या माळावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हेलिपॅड करण्यास काही संघटनांनी विरोध दर्शवला होता. याबाबत महाडच्या प्रांताधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांनी विरोध करणार्‍यांची समजूत काढली होती. त्यानंतर हेलिपॅड तयार करण्यास अनुमती दिल्याचे जाहीर केले होते. मात्र, काही संघटनांनी प्रशासनाला अल्टिमेटम देत जर राष्ट्रपतींच्या दौर्‍यानंतर हे हेलिपॅड काढून टाकणार असाल तर हेलिपॅड तयार करण्यास परवानगी देऊ, तसे पत्र देण्याचा आग्रह धरला होता.
शनिवार, दि. 4 रोजी खा. छ. संभाजीराजे यांनी दुपारी ट्विट करून राष्ट्रपती कोविंद यांच्या दौर्‍याची माहिती दिली आहे. राष्ट्रपती कोविंद रायगडावर हेलिकॉप्टरने ऐवजी रोप वे ने जाणार असल्याची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दुर्गराज रायगडावर येण्याची इच्छा राष्ट्रपती महोदयांनी व्यक्त केली आहे. यासाठी शिवभक्तांच्या भावनेचा आदर राखत ते गडावर जाण्यासाठी रोप वे चा वापर करणार आहेत.
शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे व मिलेनियम प्रॉपर्टीजच्या रोपवेच्या नवीन ट्रॉलीचे लोकार्पण करताना आ. भरतशेठ गोगावले यांनी रायगडावरील हेलिपॅडला विरोध केला. होळीच्या माळावरील छत्रपतींचा असलेला सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर हेलिकॉप्टर उतरवण्यास आपला विरोध कायम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

COMMENTS