अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे  संसार पाण्यात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे संसार पाण्यात

खरवंडी कासार प्रतिनिधी : पाथर्डी तालुका हा ऊसतोड कामगाराचा तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात व महारष्ट्राच्या बाहेर ऊसतोडणी करत असतात अवकाळी पाऊस

विद्यार्थ्यांनी वेळेच्या व्यवस्थापनाला महत्व द्यावे ः संदीप टुले
अगस्तीला मिळालेल्या कर्जाचा योग्य वापर करावा
नगरकरांना दिलासा…पाणीपुरवठा वाढणार

खरवंडी कासार प्रतिनिधी : पाथर्डी तालुका हा ऊसतोड कामगाराचा तालुका म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात व महारष्ट्राच्या बाहेर ऊसतोडणी करत असतात अवकाळी पाऊसामुळे संसार उपोयोगी साहित्य व अन्न धान्य पावसात भिजल्यामुळे ऊसतोड कामगाराना उपासमारीची वेळ अली आहे ऊसतोड कामराच्या  बिकट हलाखीचा  परिस्थिचा व्हिडीओ अन्येक  तरुणाच्या व्हाट्सअप फेसबुक दिसत आहे .   ऊसतोड कामगारांची  निवारा हा बाबू पाचट तात्पुरत्या स्वरूपाची असतात त्यांच्या तंबूचाही  दरवाजा  हा बाबूच्या व उसाच्या पाचोळ्यापासून बनवलेले असतो ऊसतोड कामगाराच्या जीवर महारष्ट्राचे राजकारण डावलून निघत असते व राजकारणाची दिशाही ऊसतोड कामगारामुळे बदलत असतात परंतु ऊसतोड कामगारांची  या  हलाखीच्या परिस्थितीकडे  पाहण्याचा सरकार किंवा कोणत्याही नेत्याला सुचत नाही परंतु निवडणूक अली कि मगच ऊसतोड कामगार  राजकारणी लोकांना आठवत असतात त्यांच्याकडे पाहण्यासाठी कुणालाही वेळ नाही व साखरकारखानाही काही मदत करत नाही त्यामुळे ऊसतोड कामगार हताश  होऊन  तंबूतले पाणी काढत  स्वतःचा संसार सावरण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्पष्ट व्हिडिओ च्या  माध्यमातून दिसत आहे गोड साखऱ्याची कडू कहाणी दिसत आहे. 

COMMENTS