खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाबाबत संशय ; पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्याच्या तपासाबाबत संशय ; पोलिस अधीक्षकांकडे चौकशीची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तपासी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी गुन्ह्यातील आरोपींना मदत व्हावी या ह

आ. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा संपन्न
वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन
पिण्याच्या पाण्याच्या टाकीत चक्क ढीगभर घाण | पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात तपासी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी गुन्ह्यातील आरोपींना मदत व्हावी या हेतूने खोटी व चुकीची कागदपत्रे तयार केली असल्याचा आरोप फिर्यादी सोपान नानाभाऊ भोगे (रा.खरवंडी ता. नेवासा) यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. याबाबत भोगे यांनी या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, नाशिक पोलिस उपमहानिरीक्षक व नगर जिल्हाधिकारी यांना पाठविल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी की, फिर्यादी यांची मुलगी कोमल हिच्या खून प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती रमेश बाळासाहेब जाधव, सासरे बाळासाहेब भागोजी जाधव, सासू सुनीता बाळासाहेब जाधव (तिघे रा. शिंगवे नाईक, ता. नगर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी रमेशला अटक केली असून बाळासाहेब व सुनीता पसार आहेत. रमेशविरूद्ध पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पसार आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयात नामंजूर झाला असून पोलिसांनी त्यांना अद्याप अटक केली नाही, असा दावा भोगे यांनी निवेदनात केला आहे. साक्षीदारांचे चुकीचे जबाब दोषारोपपत्रात जोडले आहेत. या गुन्ह्याचा तपास योग्य व पारदर्शक पद्धतीने झालेला नसून या गुन्ह्यात केवळ आरोपींना मदत व्हावी या हेतूने कागदपत्रांमध्ये फेरफार करून दोषारोपपत्र दाखल केले असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य झाला असल्याचे तपास अधिकारी यांनी म्हटले आहे.

COMMENTS