‘फरार’ परमबीर सिंग अखेर चौकशीला गेले सामौरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘फरार’ परमबीर सिंग अखेर चौकशीला गेले सामौरे

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर गुरूवारी मुंबई पोलिसांसमोर हजर झाले असून, त्यांनी कांदिवली गुन

शारदा विद्या मंदिर गेवराई च्या पार्थ मदुरेची आय.आय.टी. खरगपूर साठी निवड
फसवणूक करणारे ते मिस्टर नटवरलाल : खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
बुरखाधारी महिलेने CRPF कॅम्पवर टाकला बॉम्ब

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर गुरूवारी मुंबई पोलिसांसमोर हजर झाले असून, त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात हजेरी लावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये डीसीपी आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सिंग यांची चौकशी करत आहेत. परमबीर यांच्यासह त्यांचे वकीलही आहेत. क्राईम ब्रांचच्या ऑफिसबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि आणि ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले. परमबीर सिंग यांच्याविरोधात एका पोलीस अधिकार्‍यानेच तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून आपला छळ केल्याचा आरोप करत अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी एफआयआर दाखल केली होती. ‘परमबीर सिंग हे ठाण्याते पोलिस आयुक्त असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्याच्या त्यांच्या दबावाला मी बळी पडलो नाही. म्हणून माझ्याच विरोधात अनेक खोटे एफआयआर दाखल करायला लावून त्यांनी माझी प्रचंड छळवणूक केली. शिवाय अंतिमत: न्यायालयाच्या निकालाने माझी निर्दोष मुक्तता झालेल्या एका प्रकरणात मला नाहक 14 महिने तुरुंगवास भोगावा लागला’ असा आरोप करत पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. मनसुख हिरेन हत्या आणि अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला 100 कोटींच्या खडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे पुढील चौकशीत हे प्रकरण कोणते वळण घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

COMMENTS