स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वच्छता सर्वेक्षणात नगर राज्यात दुसरे व देशात 32 वे

अहमदनगर/प्रतिनिधी ः केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात नगर शहराचा राज्यात दुसरा तर देशात 32 वा क्रमांक आला आहे. यामुळे पुन्हा एकदा नगरच्या

युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी चेअरमन पी. एन. जोशी यांचे निधन
जिल्हा कोषागार अधिकारी धनाजी शिंदे यांना मुंबईत उपसंचालक पदी पदोन्नती
रयतच्या अध्यक्षपदी शरद पवार पुन्हा बिनविरोध

अहमदनगर/प्रतिनिधी ः केंद्र शासनाच्या स्वच्छता सर्वेक्षण अभियानात नगर शहराचा राज्यात दुसरा तर देशात 32 वा क्रमांक आला आहे. यामुळे पुन्हा एकदा नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छता अभियानात मनपाने सलग दुसर्‍यांदा सहभाग घेवून मानांकन मिळविले आहे. मनपाने स्वच्छता सर्वेक्षणमध्ये कचरा मुक्तीचे थ्री स्टार मानांकन व हागणदारी मुक्त शहराचे ओडिएफ प्लस प्लस मानांकन मिळविले आहे. यानिमित्त मनपाचा दिल्ली येथे गौरव करण्यात येत आहे. दरम्यान, स्वच्छता सर्वेक्षण 2021 चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये नगरने राज्यात दुसरे तर देशात 32 वे स्थान मिळविले आहे. स्वच्छता सर्वेक्षणमध्ये नगरला मानांकन प्राप्त झाले आहे. फाईव्ह स्टार मानांकनाचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. यामध्ये नगरला मानांकन मिळेल, अशी आशा मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे. केंद्रीय पथकाकडून डिसेंबर-जानेवारीमध्ये शहरात स्वच्छता सर्वेक्षण केले होते. यावेळी पथकाने स्वच्छतेसंदर्भातील बाबी तपासल्या होत्या. नागरिकांचा फीडबॅकही तपासण्यात आला होता. मनपा प्रशासनाने त्यासाठी 17 प्रभागात 17 ठिकाणे निवडली होती.

COMMENTS