कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील कांदा व्यापार्‍याला तब्बल दीड कोटीचा गंडा घातला गेला आहे. त्याच्याकडून कांदा खरेदी केला गेला, पण त्याचे पैसे त्याला दिले

सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्या शिवाय डॉ आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- अँड.नितीन पोळ
पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने मुन्नाभाई फरार
कृषी कंन्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरमधील कांदा व्यापार्‍याला तब्बल दीड कोटीचा गंडा घातला गेला आहे. त्याच्याकडून कांदा खरेदी केला गेला, पण त्याचे पैसे त्याला दिले नाहीत. त्यामुळे त्याने पोलिसात धाव घेतली असून, पोलिसांनी चार परप्रांतीयांवर गुन्हा दाखल केला आहे.

नगर येथील कांदा व्यापार्‍याला परराज्यातील चौघांनी दीड कोटी रुपयांचा गंडा घालून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद के., स्टीफन प्रवीण कुमार, सुजय बेलूर, मांतेश पाटील (चौघे रा. बंगळुरू, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. येथील कांदा व्यापारी गणेश तवले शेतकर्‍यांकडून कांदा खरेदी करून परराज्यातील व्यापार्‍यांना पाठवितात. तवले यांची कर्नाटकच्या तस्करबेरी अ‍ॅग्री व्हेंचर या कंपनीच्या चार जणांशी ओळख झाली. त्यातील दोघे तवले यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यांनी तवले यांना कर्नाटकमध्ये बोलावले. त्यानंतर तवले हे त्यांचे व्यवहार पाहणारे नितीन पवार यांच्यासह या कंपनीच्या बंगळुरू येथील कार्यालयात गेले. तेथे त्यांच्यात व्यवसायाची बोलणी झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सात कोटी सात लाख 29 हजार 686 रुपयांचा कांदा त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या कंपनीला वेळोवेळी पाठविला. कंपनीकडून त्यानंतर पाच कोटी 53 लाख 83 हजार 551 रुपये हे तवले यांना त्यांच्या गणेश ट्रेडिंग फर्मच्या खात्यावर पाठविले गेले. उर्वरित एक कोटी 50 लाख 46 हजार 135 रुपये मिळावे याकरिता त्यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क केला. तीन वेळा बंगळुरू येथेही जाऊन आले. परंतु कांद्याच्या बिलाचे पैसै मिळण्याची आशा धुसर झाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून व्यापारी तवले यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहेत.

COMMENTS