मनपा व जिल्हा परिषद कर्मचारी निवडणुकीत रंगणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा व जिल्हा परिषद कर्मचारी निवडणुकीत रंगणार

अहमदनगर/प्रतिनिधी ः महापालिका व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आता निवडणूक राजकारणात व्यस्त होणार आहेत. कारण, येत्या डिसेंबरमध्ये महापालिका कर्मचारी पतसंस्

बारा बलुतेदारांचा एल्गार
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका, खबरदारी घ्या – मुख्यमंत्री
अबॅकस स्पर्धेत कु. ज्ञानेश्‍वरी चन्ने जिल्ह्यात चॅम्पियन

अहमदनगर/प्रतिनिधी ः महापालिका व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आता निवडणूक राजकारणात व्यस्त होणार आहेत. कारण, येत्या डिसेंबरमध्ये महापालिका कर्मचारी पतसंस्था व जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची निवडणूक होणार आहे. महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची 18 डिसेंबरला तर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची 19 डिसेंबरला निवडणूक जाहीर झाली आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया येत्या सोमवारपासून (15 नोव्हेंबर) सुरु होणार.
महापालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेसह जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे, मनपा पतसंस्थेसाठी 18 डिसेंबरला तर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीसाठी 19 डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना सोमवारी (दि.15) प्रसिद्ध होणार असून त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. महापालिका कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसह जिल्ह्यातील 59 विविध कार्यकारी विकास सोसायटींच्या संचालक मंडळासाठी डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. या संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपून दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला. मात्र कोरोनामुळे निवडणुका स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती सहकार विभागाने उठविली असून, सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. दि. 15 ते 22 नोव्हेंबर या काळात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार असून, 23 नोव्हेंबर रोजी अर्जाची छाननी केली जाईल. अर्ज माघारीसाठी 15 दिवसांचा कालावधी असून शेवटची मुदत दि.8 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.दि 9 डिसेंबरला चिन्ह वाटप होणार आहे. महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान होणार असून, मतदानानंतर लगेचच मतमोजणी होवून निकाल घोषित केला जाणार आहे. तर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीसाठी 19 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. मतमोजणी दुसर्‍या दिवशी दि.20 डिसेंबरला होणार आहे. महापालिका कर्मचारी पतसंस्थेच्या 15 जागांसाठी ही निवडणूक होत असून पतसंस्था ताब्यात घेण्यासाठी आजी-माजी संचालकांकडून प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेचे 1 हजार 250 कर्मचारी पतसंस्थेचे मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार असल्याने प्रचारालाही वेग येणार असून कर्मचारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत. विद्यमान संचालक मंडळाने जुन्या व नव्यांची मोट बांधली असून, ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले.तर विरोधी गटाकडूनही तगडे उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्हा परिषदेत सत्ताधारी गटाकडे इच्छुकांची भाऊगर्दी असून, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सोसायटीवर गेल्या 6 वर्षांपासून श्री गणेश पॅनलची सत्ता आहे. गेल्या 6 वर्षात झालेला सभासद हिताचा कारभार पाहून पुन्हा श्री गणेश पॅनलचीच सत्ता येईल असा दावा केला जात असून त्यामुळे सत्ताधारी पॅनलकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची गर्दी जास्त आहे, असे सत्ताधारी गटाकडून सांगितले जात आहे. त्याचबरोबर त्यापूर्वी गेली 10 वर्षे सत्तेत राहिलेल्या पावन गणेश पॅनलकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. याशिवाय तिसरी आघाडीही मैदानात उतरण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीत यंदा चांगलीच चुरस पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS