Homeताज्या बातम्याशहरं

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुंना यांना नरेंद्र मोदींची आदरांजली

file photagraph नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती आहे. नेहरुंची 133 वी जयंती असून त्यांचा जन्मदिन बालदिन म्

सातारा जिल्ह्यातील पाच गुंड वर्षासाठी तडीपार
सकल हिंदू समाजातर्फे ’हिंदू गर्जना’ भव्य मोर्चा
जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्‍न मार्गी लावा : पालकमंत्री
file photagraph

नवी दिल्ली : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज जयंती आहे. नेहरुंची 133 वी जयंती असून त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरु यांच्या जयंतीनिमित्त ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे.
लहान मुले हीच देशाची खरी ताकद असल्याचे नेहरु मानत होते. त्यांचे लहान मुलांवर असलेले प्रेम यामुळे त्यांच्या जन्मदिनी बालदिन साजरा करण्यात येतो. नेहरु यांच्या निधनापूर्वी भारतात 20 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जात असे. संयुक्त राष्ट्राने याच दिवसाला जागतिक बालदिन असे घोषित केले होते. मात्र, नेहरुंच्या निधनानंतर भारातातील बालदिनाची तारीख नेहरुंची जंयती दिवशी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी भारतीय संसदेत एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
बालदिन साजरा करण्याचा उद्देश हा नेहरुंना श्रध्दांजली वाहणे तसेच लहान मुलांचे अधिकार, त्यांचे पालन पोषण आणि शिक्षणाबद्दलची जनजागृती निर्माण करणे हा होता. नेहरु यांच्या शब्दात सांगायचे तर आजची मुले ही उद्याचा भारत निर्माण करणार आहेत. ज्या पध्दतीने आपण त्यांना घडवू त्यानुसारच देशाचे भविष्य ठरणार आहे.

COMMENTS