इंदोरीकर महाराजांकडून युटयुब चॅनेलला नोटिसा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांकडून युटयुब चॅनेलला नोटिसा

प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यासंबंधातील खटल्यातून दिलासा मिळाला.

शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी श्रीगोंद्यात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन
शिक्षक बँक सत्ताधार्‍यांनी 24 कोटींचा हिशेब लपवला ; गुरुमाऊलीच्या एका गटाचा आरोप
माजी विद्यार्थिनीने 45 वर्षानंतर शाळेप्रती केली कृतज्ञता व्यक्त

अहमदनगर/प्रतिनिधी : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यासंबंधातील खटल्यातून दिलासा मिळाला. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारे वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयातील खटला रद्द करण्यात आला.

आता इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणार्‍या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. पुण्याच्या स्वारगेट  पोलिस ठाण्यातून युटुयब चॅनेल्सना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. निवृत्ती महाराज इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी त्याचे खापर युट्युब चॅनेल्सवर फोडले होते. त्यांनतर त्यांनी पुणे येथील स्वारगेट पोलिस ठाण्यात भारतीय तंत्रज्ञान कायदा कलम 66, 66 सी, 43 आय, भा.द.वि.कलम 504,506 नुसार गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 ला तक्रार केली होती. इंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास कोरोना विषाणू संसर्गामुळे संथ गतीने सुरू होता; परंतु फेब्रवारीपासून तपास जलद गतीने चालू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार हजार किर्तनाच्या व्हिडीओच्या युट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत. पोलिसांकडून 25 ते 30 मोठ्या युट्युब चॅनेलला नोटीस पाठवल्याची माहिती आहे. इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनेल नसल्याचे म्हटले होते. कीर्तनामध्ये समाजप्रबोधनाच्या भावनेतून बोलतो. युटयुब चॅनेलवरुन माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका युटुयब चॅनेलच्या चालकांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचेही इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले होते. आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे आणि व्हिडीओमध्ये छेडछाड करून प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीत केली होती.

COMMENTS