आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, की ' भांडण दोन चोरांत असलं की सत्य बाहेर येतं!' सध्या महाराष्ट्रात लोकांची करमणूकही होतेय आणि सत्य देखील बाहेर येतेय. स
आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, की ‘ भांडण दोन चोरांत असलं की सत्य बाहेर येतं!’ सध्या महाराष्ट्रात लोकांची करमणूकही होतेय आणि सत्य देखील बाहेर येतेय. सध्या नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदा याच प्रकारात मोडतात. खरेतर, लोकशाही व्यवस्थेत राजकीय सत्ता ही लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत असावी. पण होते भलतेच. संख्येने मोठे असणारे सामाजिक समुदाय हे मतदार म्हणून ही बहुसंख्य असताना त्यांच्या वाट्याला ना राजकीय पक्षाचे पद येते ना सरकारमध्ये सत्तास्थान! मग, उरतो एकच कार्यक्रम राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय पक्षांना सत्ता सोपवा आणि त्यातील ब्राह्मण-मराठा समाजाने ती येथेच्छ उपभोगावी आणि अडचणीचा काळ आला की, भुजबळ, मलिक यांच्यासारख्या मुख्य सत्ताधाऱ्यांच्या पखाली वावरणाऱ्या व्यक्तिंना विरोधकांच्या आक्रमणाला थोपविण्यासाठी पुढे करायचे.महाराष्ट्र विधानमंडळ अधिवेशनात देखील यापेक्षा वेगळे चित्र नसते. गोटे, मुंढे, आव्हाड, राठोड, असली नावे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष नेत्यांच्या कामी येतात. सत्ताधारी पक्षाच्या एखाद्या नेत्याला आजचा विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून टार्गेट करायचे ठरवले तर अशाच नावांच्या यादीतून एक नाव निवडले जाते; तर विरोधी पक्षातून टार्गेट करण्यासाठी सत्ताधारी देखील त्याच नावांची यादी कामी आणतात. मात्र, महाराष्ट्रात पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस सारख्या सनातन कडव्या ब्राह्मण नेत्याला नवाब मलिक यांनी आव्हान दिले आहे. आज फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड संबंध असल्याचे सांगितले. मलिक यांनी तडकाफडकी आरोप फेटाळून उद्या दहा वाजेपर्यंत थांबा, अशा शब्दांत प्रति आव्हान दिले. गेल्या काही दिवसांपासून मलिक यांनी समिर वानखेडे नावाच्या अधिकाऱ्याला फैलावर घेतल्यानंतर त्यांच्या बचावाला भाजपने उतरणे आणि आता त्याच भाजपच्या राज्याच्या सर्वोच्च नेत्याला आव्हान देणे अशा टोकावर ही बाब आली. आमच्या मते सत्तापक्ष आणि विरोधीपक्ष यांच्यातील हे आव्हान-प्रतिआव्हान केवळ राजकीय राहिले नसून ते निर्णायक अशा सामाजिक लढ्याकडे अग्रेषित होत असल्याचे यातून दिसते आहे. त्यामुळे या सत्ताप्रवर्गांनी आता सत्ता खऱ्या बहुजनांकडे सोपवून मोकळे व्हावे!सत्ताधारी जातवर्गाने दीर्घकाळ सत्ता उपभोगल्याने त्यांना सत्तेचे अपचन झालेय! त्यांनी बहुजनांकडे सत्ता सोपवावी.
COMMENTS