काळेंच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल : केदार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काळेंच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल : केदार

अहमदनगर/प्रतिनिधी : आम्हाला किरण काळेला शहराचा सर्वेसर्वा करायचा आहे. त्याच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल, असा दावा क्रीडा मंत्र

केडगावच्या दोघांची पोलिसांनी केली चौकशी ; पत्रकार बोठेला मदत केल्याचा संशय
संगमनेर बस स्थानक विकासकाला साडे तीन कोटींचा दंड
BREAKING: जिल्हाधिकारींना भेटण्यास करोन RT–PCR टेस्ट बंधनकारक | Ahmednagar | Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : आम्हाला किरण काळेला शहराचा सर्वेसर्वा करायचा आहे. त्याच्या अंगाला गुलाल लावण्याची संधी आम्हाला नक्की मिळेल, असा दावा क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सोमवारी सावेडीच्या कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये केला. महसूल मंत्री बाळासाहेब तोरात यांच्या उपस्थितीतच मंत्री केदार यांनी काळेंच्या आमदारकीचे केलेले सुतोवाच नगरमध्ये चर्चेचे झाले आहे. दरम्यान, शहराचे व जिल्ह्याचे क्रीडा प्रश्‍न सोडवण्यासाठी आठ दिवसात पुन्हा नगरला बैठक घेण्याचे आश्‍वासनही त्यांनी दिले.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल मंत्री थोरात व क्रीडा मंत्री केदार यांनी सोमवारी दुपारी कोहिनूर मंगल कार्यालयात नगर शहरातील विविध क्रीडा संघटना, क्रीडापटू, क्रीडा प्रशिक्षक, क्रीडा शिक्षक यांची बैठक घेतली. यावेळी विविध क्रीडा प्रश्‍नांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना मंत्री केदार यांनी, आगामी आमदारकीसाठी काळे यांना काँग्रेसच्यावतीने शहरात पूर्ण ताकद दिली जाणार असून शहरात काळे यांना काँग्रेसचा आमदार करण्यासाठी पक्ष भक्कमपणे काळे यांच्या पाठीशी उभा असल्याची घोषणाच केली. ते पुढे म्हणाले की, मंत्री थोरात यांच्या नेतृत्वात 2019 च्या निवडणुकीमध्ये पक्ष राज्यात सत्तेत आला. त्याच पद्धतीने नगर शहराचे देखील काळे सर्वेसर्वा होतील याचा मला पूर्ण विश्‍वास आहे, असे त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. नगरमधील क्रीडा संघटना आणि क्रीडापटूंचे प्रश्‍न मी मार्गी लावून देतो. तुम्हाला मुंबईला, पुण्याला बैठकीसाठी बोलणार नाही. येत्या आठ दिवसात मी पुन्हा नगरला येणार असून, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडाधिकारी तुम्ही फाईल काढून ठेवा. आपल्याला शहरातील क्रीडा क्षेत्राचे प्रश्‍न सोडवायचे आहेत, असे स्पष्ट करून केदार म्हणाले, आजच्या धावत्या दौर्‍यामध्ये संघटनांच्या प्रतिनिधींचे मनोगत इच्छा असूनही ऐकता आले नाही. मात्र, पुढील दौर्‍यामध्ये मी सगळ्यांचं सविस्तर ऐकणार आहे. क्रीडा संघटनांना न्याय देण्याचे काम त्या माध्यमातून केले जाईल, असा विश्‍वास त्यांनी क्रीडा संघटनांना दिला. येत्या डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये मुलींच्या वसतिगृहासाठी निधी मंजूर करण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. प्रास्ताविक काळे यांनी केले. वाडिया पार्कसारख्या विस्तीर्ण मैदानात सोयी-सुविधांचा अभाव आहे. या मैदानावर कबड्डी व लॉन टेनिससाठी सिंथेटिक मैदान पाहिजे तसेच नगर-पुणे महामार्गालगत सुमारे सात एकराचा भूखंड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या नावाने असून तो मागील तीस-चाळीस वर्षांपासून पडिक आहे. या मैदानावर पुण्याच्या बालेवाडीच्या धर्तीवर मिनी बालेवाडी उभे करण्यासाठी सायकलिंग ट्रॅक, तसेच सर्व खेळांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मदत करावी, अशी मागणी त्यांनी मंत्री केदार यांच्याकडे केली. जिल्हा क्रीडा संकुल आवारात 18 ते 20 गाळे पडीक आहेत. शहरातील क्रीडा संघटनांना हे गाळे त्यांच्या कार्यालयांसाठी उपलब्ध करून दिले जावेत. स्पर्धा आयोजनासाठी मुलींचे वस्तीगृह नसल्यामुळे आयोजक संघटनांना मोठा खर्च स्पर्धकांच्या राहण्याचा करावा लागतो. यासाठी मुलींचे वस्तीगृह करून द्या. मुलांचे वसतिगृह अद्ययावत करून द्या. खेलो इंडियाचे नगरला एकच सेंटर मिळाले. पण, बाकी खेळांचा देखील प्रश्‍न मिटला पाहिजे. त्यांचे सुद्धा सेंटर्स केंद्र सरकार कडून नगरला मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने मदत करावी, अशी मागणी यावेळी काळे यांनी केली. यावेळी आ.संग्रामदादा थोपटे, आ. लहू कानडे, आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे, शहर क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, रंगनाथ डागवले, राजेंद्र कोतकर, संजय साठे, सुनील जाधव, आप्पासाहेब शिंदे, दिनेश भालेराव, विलास दवणे, विजय म्हस्के, नीलेश शेलार, जयसिंग काळे, क्रीडा अधिकारी विशाल गर्जे, ज्ञानेश्‍वर खुरंगे, घनश्याम सानप, संभाजी लोंढे, शैलेश गवळी, मच्छिंद्र साळुंके, नारायण कराळे, प्रसाद पाटोळे, आदिल सय्यद आदींसह क्रीडा संघटना, क्रीडा प्रशिक्षक उपस्थित होते.

शिवछत्रपतीचे यजमानपद द्या
यावेळी बोलताना काळे यांनी, शिवछत्रपती पुरस्कार सोहळा आयोजनाचे यजमान पद नगरला द्या. आम्ही त्याची जोरदार तयारी करून या माध्यमातून नगरचे नाव सर्वदूर पोहोचवू, असा विश्‍वास व्यक्त केला. तसेच वादग्रस्त भूतपूर्व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामुळे नगरचे क्रीडा क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले असल्याने भविष्यात याची पुनरावृत्ती नको म्हणून सकारात्मक मनोवृत्तीचा, कार्यक्षम जिल्हा क्रीडाधिकारी नगरला देण्याची मागणी यावेळी काळे यांनी क्रीडा मंत्र्यांकडे केली.

COMMENTS