Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द

शिरवडे / वार्ताहर : उसाला एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखा

स्वयंपूर्ण गावासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा- कृषिमंत्री दादाजी भुसे
Yeola : येवल्यात कांदा व्यापाऱ्यांनी पाडला लिलाव बंद | loknews24
अशोक’ चा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ संपन्न

शिरवडे / वार्ताहर : उसाला एकरकमी एफआरपी द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील सह्याद्री साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबध्द केले. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर ऊसदाराचे आंदोलन झाले नाही.
एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर आंदोलन करण्यात येणार होते. ते आंदोलन होऊ नये, यासाठी पोलिस अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी आंदोलनावर ठाम होते. त्यानुसार काल सह्याद्री कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येणार होते.
मात्र, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबध्द केले. त्यामुळे आंदोलन झाले नाही. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कारखाना कार्यस्थळावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कराड-मसूर मुख्य रस्त्याने मोठ्या वाहनांची वाहतूक वळविण्यात आली. सह्याद्री कारखान्याकडे येणार्‍या कराड-मसूर रस्त्यावर शहापूर फाटा, तसेच उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीनजीक, शिरवडे रेल्वे स्टेशन, तासवडे टोलनाका सर्व मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळबीडच्या सपोनि जयश्री पाटील यांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.

COMMENTS