Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरच्या माजी महापौरांचे थेट महापालिकेच्या दारातच अभ्यंगस्नान

कोल्हापूर / प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेकदा आश्‍वासने देऊनही दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने करता आले नसल्याने माजी

सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू
संशयितरित्या फिरणाऱ्या तिघा जणांवर गुन्हे दाखल l LokNews24
गौतम अदानींबाबत पंतप्रधानांनी उत्तर द्यावे : आ. पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर / प्रतिनिधी : पालकमंत्री सतेज पाटील यांनी अनेकदा आश्‍वासने देऊनही दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने करता आले नसल्याने माजी महापौर सुनील कदम यांनी महापालिकेच्या दारात पंचगंगा नदीचे बादलीतून आणलेल्या पाण्याने दिवाळीचे अभ्यंगस्नान केले. यावेळी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांच्यासह भाजप ताराराणी आघाडीचे अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते.
कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याच्या योजनेचे काम गेल्या सात वर्षापासून सुरू आहे. यंदाच्या वर्षी हे काम पूर्ण होईल आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईप लाईनच्या पाण्याने होईल, असे आश्‍वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. पण यंदाच्या वर्षी हे काम पुर्ण झाले नाही. याची आठवण करून देत माजी महापौर सुनील कदम यानी थेट पाईपलाईनचे पाणी मिळाले नसल्याने पंचगंगेच्या पाण्याने महानगर पालिकेच्या दारातच अभंगस्नान केले. यावेळी भाजपचे अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे, वैभव माने, राजसिह शेळके, किरण नकाते उपस्थित होते.
सुनिल कदम म्हणाले, सन 2014 पासून पालकमंत्री सतेज पाटील हे कोल्हापूरच्या जनतेला फसवत आहेत. यंदाच्या वर्षी हे काम पूर्ण होईल आणि दिवाळीचे अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने करता येईल, असे आश्‍वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले होते. पण हे आश्‍वासन त्यांनी पाळले नाही. त्यामुळे महानगर पालिकेच्या दारात पंचगंगेच्या पाण्याने मी हे अभ्यंगस्नान करत आहे. कोल्हापूरच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याचा प्रश्‍न निकालात काढावा, यासाठी आपण हे आंदोलन केले आहे.

COMMENTS