शिवसेनेचे पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ श्रीगोंद्यात सायकल रॅली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचे पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ श्रीगोंद्यात सायकल रॅली

श्रीगोंदा प्रतिनिधी: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवसेना सचिव वरूनजी  सरदेसाई,  शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर शिवसेना

संगमनेरमध्ये भीषण अपघात ; एक जण गंभीर जखमी I LOKNews24
संगमनेरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावरील टोल कर्मचाऱ्यांचे आंदोलन
चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण

श्रीगोंदा प्रतिनिधी: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवसेना सचिव वरूनजी  सरदेसाई,  शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे युवा सेना संपर्कप्रमुख संजय साटम युवा सेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच गॅस दरवाढीच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने चुलीवर भाकरी थापून निषेध व्यक्त करण्यात आला पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे हाल बेहाल होत आहेत.  रोज होणारी  इंधन दरवाढ सामान्य नागरिकांना परवडणारे नसून वाहन  वापरण्याऐवजी सायकलवर प्रवास करण्याची वेळ आता देशातील नागरिकांवर आली आहे या सर्व प्रक्रियेचा विरोधात केंद्र सरकारच्या वतीने निर्धारित करण्यात आलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलकांनी सायकल रॅली करत जोरदार घोषणाबाजी करण्यात केली इंधन दरवाढ केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दुतारे  यांनी दिला .पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ व केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात संबंध राज्यभर शिवसेना युवा सेनेच्या वतीने काल 31 10 21 रोजी रविवार रोजी आंदोलन करण्यात आले यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख मनिषा ताई काळे चोराचीवडी ग्रामपंचायत सदस्य निलेश साळुंखे शहराध्यक्ष संतोष खेतमाळीस ,सुरेश देशमुख, गोपीनाथ गोंडे,  जयराम गोरे, ओमकार शिंदे, सुनील शिंदे, नितीन शिंदे, युवराज  सावंत ,बापू मस्के, श्रीराम मस्के ,शरद नागवडे ,भीमराव घुले, हरिभाऊ काळे, नूतन पानसरे ,गायकवाड मॅडम ,अतुल झरेकर ,रोहन मोरे ,राहुल नवले सह मोठ्या संख्येने शिवसैनिक व युवासैनिक महिला आघाडी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते

COMMENTS