कर्जत प्रतिनिधी पिकअप चालकाने गाडी भरधाव वेगात पाठीमागे घेऊन मोटारसायकलला जोरात धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कर्ज
कर्जत प्रतिनिधी
पिकअप चालकाने गाडी भरधाव वेगात पाठीमागे घेऊन मोटारसायकलला जोरात धडक दिली. त्यामुळे मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, राजेंद्र पांडूरंग बळे, वय ४०. रा.वाळूंज ता. आष्टी यांच्या मोटारसायकलला ( एमएच २३, एएच ८७७३) पिकअपने (एमएच-१६, एवाय ९४४२) जोरदार धडक दिली. पिकअप मागे घेत असताना हा अपघात घडला. यामध्ये बडे यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली व मोटारसायकलचे नुकसान झाले. पिकअपचा चालक सुभाष बलभीम सुद्रिक रा. कौडाणे, ता. कर्जत हा बळे हे जखमी असतानाही त्यांना दवाखान्यात न नेता निघून गेला. त्याच्याविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS