कर्जत : प्रतिनिधी कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली होती. ही रक्कम दुचाकीवरून बॅग
कर्जत : प्रतिनिधी
कर्जतच्या एका आडत दुकानदाराने शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यासाठी बॅंकेतून दहा लाखांची रोकड काढली होती. ही रक्कम दुचाकीवरून बॅगमध्ये मार्केटकडे घेऊन येत असताना दोन हमाल कामगारांनी ही बॅग हिसकावून पळवुन नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर घटनेतील आरोपीला गजाआड करण्यात आता कर्जत पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, पियुष रविंद्र कोठारी रा.कर्जत यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्जत येथे आडत दुकान आहे.शेतकऱ्यांकडुन खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी दहा लाखांची रक्कम कर्जत येथील अर्बन बँकेतून काढून बॅगमध्ये घेऊन मोटारसायकलवर ते मार्केटकडे येत होते. कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर त्यांच्याच दुकानात हमालीचे काम करणारे कामगार सोमनाथ विठ्ठल साळुंखे, वय-२७ वर्षे व प्रमोद विजय आतार, वय- १९ वर्षे, दोघेही रा.कोरेगाव ता. कर्जत यांनी फिर्यादी पियुष कोठारी यांच्या मोटारसायकलवर असलेली बॅग हिसकाऊन पळवून नेली. तशी फिर्याद कोठारी यांनी दि.४ ऑक्टोबर रोजी दिली होती. आरोपींचा शोध घेणे कर्जत पोलिसांसाठी आव्हान होते.
तपास केल्यानंतर आरोपी प्रमोद विजय आतार हा दि.२९ रोजी पोलिसांच्या गळाला लागला असुन सोमनाथ साळुंखे हा फरार आहे. अटक असलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. कर्जत पोलिसांनी त्यास २९ ऑक्टोबर रोजी अटक करून ३० ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि.८ नोव्हेंबरपर्यंत ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीवर यापूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, सतीश गावित, पोलीस अंमलदार श्याम जाधव, आण्णासाहेब चव्हाण, उद्धव दिंडे, पांडुरंग भांडवलकर, सचिन वारे, सुनिल खैरे , गोवर्धन कदम, शाहूराज टिकटे, भाऊ काळे, शकील बेग, नितीन नरुटे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, सचिन वारे हे करत आहेत.
COMMENTS