Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मसूर-उंब्रज परिसरात 42 लाखाला गंडा घालणारे दोघेजण ताब्यात

मसूर / प्रतिनिधी : ट्रिनीटी एफ एक्स व आँस्कर एफ एक्स या ट्रेंडिंग कंपनीतील फाँरेक्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने व तिप्पट फायदा मिळ

शेल्टी येथील विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाँचद्वारे सुरक्षित प्रवास
मनसे प्रमुख राज ठाकरे यांना कोर्टाचा पुन्हा धक्का; गुन्ह्यातून वगळण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन; पुरंदर तालुक्यातील आंबळे ग्रामपंचायतीचा गजब प्रकार

मसूर / प्रतिनिधी : ट्रिनीटी एफ एक्स व आँस्कर एफ एक्स या ट्रेंडिंग कंपनीतील फाँरेक्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने व तिप्पट फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन मसूर व उंब्रज येथील युवकांना 42,36,860/- रुपयांचा फसवणूक करून गंडा घालणार्‍या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी केला. सुनील नवीनचंद्र रूबाला (वय 32, रा. याजू पार्कजवळ विरार, पश्‍चिम पालघर) व यशवंत विजय नारायण यादव (वय 30, रा. आकुर्डी रोड, हनुमाननगर, कांदिवली, पूर्व मुंबई, मूळ उत्तर प्रदेश) या दोघांना न्यायालयापुढे उभे केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अभिषेक चंद्रशेखर वेल्हाळ (रा. मसूर) यांना 1 जानेवारी 2021 महिन्यात वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन कॉल आले. ट्रिनीटी एफएक्स व ऑस्कर एफएक्स या ट्रेंडींग अ‍ॅप विषयी माहिती सांगितली. त्यांनी त्यांचे कंपणीचे अकाऊंट नंबर फोनवर पाठविले व वेळोवेळी पैशाची गुंतवणुक करणेस सांगितले. त्यामध्ये गुंतवलेले पैसे दोन महिन्यांमध्ये 3 पट होतील असे सांगितले.
जास्तीत-जास्त पैशाचा परतावा मिळेल, असे सांगितले. म्हणून फिर्यादीने 1/1/2021 ते 31/07/2021 रोजीपर्यंत वेळोवेळी ट्रिनीटी एफ एक्स व आँस्कर एफ एक्स या ट्रेंडिंग कंपनीनी दिलेले बँक अकाउंट नंबर याचेवर वेळोवेळी सुमारे 21,91,360/- रुपये पाठविले. तसेच फिर्यादीचे मित्र सचिन प्रकाश जगदाळे, आनंदा सदाशिव जगदाळे, मोहन प्रकाश जगदाळे (सर्व रा. मसूर, ता. कराड जि. सातारा), दिग्विजय पांडुरंग मराठे (रा. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) यांचेशी देखील ट्रिनीटी एफएक्स व आँस्कर एफएक्स या ट्रेंडिंग कंपनीचे वरील अनोळखी इसमांनी वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन संपर्क साधून सदर फाँरेक्स ट्रेंडींग कंपनीमधील मोबाईलवर संपर्क साधुन ट्रिनीटी एफएक्स व आँस्कर एफएक्स या ट्रेंडिंग अँपवरती वेळोवेळी पैशाची गुंतवणुक करणेस सांगितले. त्यामध्ये गुंतवणुक केलेले पैसे दोन महिन्यांमध्ये 3 पट व जास्तीत-जास्त पैशाचा परतावा मिळेल, असे सांगितले. म्हणून त्यांनी त्यांचे बँक अकांउंटवरुन ट्रिनोटी एफएक्स व आँस्कर एफएक्स या ट्रेंडिंग कंपनीचे वरील अनोळखी इसमांनी दिलेले वेगवेगळे बँक अकाउंटवर वेळोवेळी सचिन जगदाळे याने 7,24000/- रुपये, आनंदा जगदाळे 6,71,500/- रुपये, दिग्विजय मराठे 200000/- रुपये, मोहन जगदाळे यांनी 4,50,000/- रुपये, वेळोवेळी पाठविले आहेत. फिर्यादी व त्याचे मित्रांनी ट्रिनीटी एफएक्स व आँस्कर एफएक्स या ट्रेंडिंग अ‍ॅपमध्ये गुंतवणुक केलेले पैशाचे व्यवहार फिर्यादी व त्याच्या मित्रांना त्या अ‍ॅपच्या माध्यमातून फोनवर दिसत होते.
परंतू अचानक जुलै 2021 महिन्यांमध्ये ट्रिनीटी एफएक्स व आँस्कर एफ एक्स या ट्रेंडिंग हे दोन्ही अँप अचानक बंद झाले म्हणुन फिर्यादी व त्याचे मित्रांनी सदर कंपनीशी संबंधीत वरील फोन नंबर वर वारंवार संपर्क साधला. परंतू त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही, फोन घेण्याची त्यांनी टाळाटाळ केले त्यानंतर फिर्यादीचे फिर्यादी व त्याचे मित्रांची फसवणुक झाल्याची लक्षात आले. फिर्यादी व त्याच्या मित्रांनाा अनोळखी इसमाने 01/01/2021 ते 31/7/2021 रोजी पर्यंत ट्रिनीटी एफएक्स व ऑस्कर एफएक्स या ट्रेंडिंग कंपनीतील अनोळखी इसमांनी दिलेले खालील बँक अकाउंट नं. याचेवर वेळोवेळी फोन पेव्दारे, बँक ट्रान्सफर एनईएफटीने पैसे पाठविले फिर्यादी व त्याचे मित्रांना मोबाईल नंबरवरुन फोन करुन फाँरेक्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणुक करण्याचे बहाण्याने व जास्त फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी व त्याचे मित्रांना फोन करुन वेळोवेळी केलेली एकूण गुंतवणुक 42,36,860/- रुपये रक्कम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ट्रांन्सफर करुन घेवुन फसवणुक झाली होती.

COMMENTS