“लगन”चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित (Video)

Homeताज्या बातम्याशहरं

“लगन”चित्रपटाचा मोशन पोस्टर प्रदर्शित (Video)

लगन चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे प्रदर्शन सोहळा बीड येथे संपन्न झाला. अर्जुन गुजर दिग्दर्शित व जी.बी. इंटरटेनमेंट निर्मित 'लगन' या चित्रपटाच्या मोशन पो

वयाच्या ६०व्या वर्षी आशिष विद्यार्थी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर
वेळेवर बस सोडा; विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायतसमोर ठिय्या
ओमायक्रॉन संकटात बजेट कोलमडू नाही यासाठी करा हे.! | LokNews24

लगन चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे प्रदर्शन सोहळा बीड येथे संपन्न झाला. अर्जुन गुजर दिग्दर्शित व जी.बी. इंटरटेनमेंट निर्मित ‘लगन’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण करण्यात आले .  शांतिवन अनाथ आश्रमाचे संचालक   दिपक नागरगोजे ,कोविड योद्धाशुभम धूत , बाळा बांगर व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक संदीप पवार यासह आदी मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम सोहळा पार पडला .  प्रतिकूल परिस्थितीत ज्या प्रमाणे झगडत आपण सारे सामाजिक कार्यात कार्यरत आहोत. याच प्रमाणे बीड जिल्ह्यातील ग्रामीण युवक आता चित्रपट क्षेत्रातही आपले कौशल्य दाखवत आहेत .ही अतिशय समाधानाची बाब आहे असे प्रतिपादन शांतीवनचे संचालक दीपक नागरगोजे यांनी केले. याप्रसंगी कोविड योद्ध्यांचा गौरव करण्यात आला .  एमएसईबीच्या उपअभियंता शिल्पा जाधव, महावितरणच्या कर्मचारी उषा जगदाळे, सफाई कर्मचारी कांता धन्वे, यासह आदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला .  

COMMENTS