राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग… ३२ नगरसेवकांनी हाती बांधले घड्याळ…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग… ३२ नगरसेवकांनी हाती बांधले घड्याळ…

प्रतिनिधी: उल्हासनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्हासनगर शहरात मोठा राजकीय भूकंप केला आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा निधी मंजूर
बीड जिल्हाभूमि अभिलेख अधिक्षक शिंदे साहेबाची केज तालुक्यावर वक्रदृष्टी केजचे उप अधिक्षक पद रिक्तच
संजय राऊतांनी केला राणेंविरोधात अबु्रनुकसानीचा दावा

प्रतिनिधी: उल्हासनगर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उल्हासनगर शहरात मोठा राजकीय भूकंप केला आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला.

त्यानंतर टीम कलानींच्या २२ नगरसेवकांसह इतर पक्षातील १० नगरसेवकांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.

पंचम कलानी या तांत्रिकदृष्ट्या भाजपच्या चिन्हावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. आता राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी पंचम कलानी यांनी उल्हासनगरचे महापालिका आयुक्त राजा दयानिधी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. 

टीम ओमी कलानींच्या भाजपच्या चिन्हावर निवडून आलेल्या २२ नगरसेवकांनी हातावर ‘घड्याळ’ बांधले आहे. यावेळी उल्हासनगर महापालिकेवर आता राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. कलानी परिवाराच्या प्रवेशामुळे शहरात राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळेल, असेही आव्हाड म्हणाले.

COMMENTS