नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 35-35 पैसे प्रति लिटरने महागले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत वाढून
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दोन्ही 35-35 पैसे प्रति लिटरने महागले आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत वाढून 106.89 रुपये तर डिझेलची किंमत 95.62 रुपये प्रति लिटर झाली आहे. देशात सलग तिसर्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वच रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलची किंमत आता 112.78 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. तर डिझेलची किंमत 103.63 रुपये प्रति लिटर झाली आहे. देशातील सर्व मोठ्या महानगरांपैकी पेट्रोल-डिझेलच्या सर्वाधिक किमती मुंबईत आहेत. तर कोलकाता आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किमती क्रमशः 107.45 रुपये प्रति लिटर आणि 103.92 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 98.73 रुपये प्रति लिटर आणि 99.92 रुपये प्रति लिटर आहे.
भारतात गेल्या 28 दिवसांपैकी 22 दिवस डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. ज्यामुळे दिल्लीमध्ये त्याच्या किरकोळ किमतीत सुमारे 7 रुपयांनी वाढ झाली आहे. इंधन आता देशातील अनेक भागांत 100 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. पेट्रोलच्या किमतींमध्ये गेल्या 24 दिवसांमध्ये 19 दिवस वाढ झाली. त्यामुळे याच्या किमतींमध्ये 5.70 रुपये प्रति लिटरने वाढ झाली आहे. देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, पुद्दुचेरी, तेलंगणा, पंजाब, सिक्किम, ओडिशा, केरळ, तामीळनाडू, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पलिकडे गेले आहेत.
COMMENTS