खड्ड्यांना वैतागलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्याला चालवले चिखलातून (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खड्ड्यांना वैतागलेल्या नागरिकांनी अधिकाऱ्याला चालवले चिखलातून (Video)

 धुळे शहरातील वाडिभोकर रस्त्यावर शिवसेनेने थेट रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार असाच जाब विचारत "ऑन द स्पॉट" आंदोलन केले. धुळे शहरातील वाडिभोकर रस्त्याव

हुकूमशाही दारापर्यंत पोहोचली
‘रंगलेल्या गालाचा मुका’ प्रवीण दरेकरांना भोवला… पोलिसांत तक्रार दाखल…
मानवी तस्करी प्रकरणी फ्रान्सनं 4 दिवस रोखून धरलेलं विमान मुंबईत दाखल

 धुळे शहरातील वाडिभोकर रस्त्यावर शिवसेनेने थेट रस्त्याचे काम कधी पूर्ण करणार असाच जाब विचारत “ऑन द स्पॉट” आंदोलन केले. धुळे शहरातील वाडिभोकर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांच्या कामांसाठी मोठे खड्डे करून ठेवले आहेत .

तसेच मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर पाणी साचल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात  नुकसान होत आहे. याबाबत काही व्यवसायिकांनी शिवसेनेकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने थेट रस्त्यावर येऊन आंदोलन केले.

या आंदोलनावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्याला चक्क नागरिकांनी ढकलत चिखलातून चालवले .  आणि  येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे . 

COMMENTS