Hingoli-: संतप्त नातेवाइकांनी महिलेचा मृतदेह ठेवला नगरपरिषदेच्या प्रांगणात (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Hingoli-: संतप्त नातेवाइकांनी महिलेचा मृतदेह ठेवला नगरपरिषदेच्या प्रांगणात (Video)

हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील मातंग समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी भौतिक सोयीसुविधांचा अभाव असल्याने आणि स्मशानभूमीत जायला धड रस्ताही शि

सातारा-जावलीतील 26 ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी 5 कोटी 20 लाख ; आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा
प्रतापव ढाकणे यांना आमदार करण्यासाठी कामाला लागा
येसगावच्या विकासाची वाटचाल कायम सुरू राहील ः कोल्हे

हिंगोलीच्या कळमनुरी शहरातील मातंग समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी भौतिक सोयीसुविधांचा अभाव असल्याने आणि स्मशानभूमीत जायला धड रस्ताही शिल्लक नसल्याने  संतप्त नातेवाईकांनी मयत महिलेचा मृतदेह थेट नगर परिषदेच्या कार्यालयासमोरच आणून ठेवला. गेल्या अनेक वर्षांपासून मातंग समाजाच्या नागरिकांकडून या स्मशानभूमीत भौतिक सुविधा व रस्ता करण्याची मागणी केली जात आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाकडून मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या नागरिकांनी व मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह स्मशानभूमीकडे नेण्याऐवजी थेट नगरपरिषदेच्या प्रांगणातच नेऊन ठेवला. त्यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर व नगरपालिका प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

COMMENTS