Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा तालुक्यात लॉकडाउननंतर पहिल्या कुस्ती मैदानास प्रारंभ

कुसाईवाडी : कुस्तीच्या मैदानाचे उद्घाटन करताना जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, कोकरुडचे सपोनि ज्ञानदेव वाघ, ऑलिम्पिक वीर पै. बंडा पाटील व मा

नृत्यकला अकॅडमीची विद्यार्थिनी पौर्णिमा अंबरगे ठरली मिस फलटण
शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द
नवीन खेळाडूंना चालना देण्याकरिता चेस इन स्कूल हा उपक्रम शहरात राबविणार -नरेंद्र फिरोदिया
कुसाईवाडी : कुस्तीच्या मैदानाचे उद्घाटन करताना जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक, कोकरुडचे सपोनि ज्ञानदेव वाघ, ऑलिम्पिक वीर पै. बंडा पाटील व मान्यवर. (छाया : आनंदा सुतार, खुजगांव).

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यात डोंगर कपारीत वसलेले कुसाईवाडी हे गाव कु. साईमातेच्या याञेनिमित्त दरवर्षी दसर्‍याला या वाडीत यात्रा भरते. कोरोनाच्या काळात यात्रा आणि कुस्ती मैदानास परवानगी नसल्याच्या कारणाने एक वर्ष याठिकाणी कुस्ती मैदान रद्द करण्यात आले होते. परंतू कोरोना महामारीची लाट मावळल्याने कुसाईवाडी, हुंबरवाडी, दुरंदेवाडी, पन्हाळवाडी ग्रामस्थांनी दसर्‍याच्या मुहुर्तावर शिराळा तालुक्यातील पहिल्या कुस्ती मैदानाचा नारळ फोडला. या तिन्ही वाडीत हातावर मोजण्या इतपत पैलवान मात्र येथील कुस्ती शकिन छोट्या प्रमाणात का होईना गेली कित्येक दशके या मैदानाचे आयोजन करून शिराळा तालुक्यातील पहिल्या कुस्ती मैदानाचा शुभारंभ करत असतात. आज कोरोना सारख्या महामारीनंतर शिराळा तालुक्यातील कुस्ती क्षेत्राला खरोखर नवसंजिवनी मिळणार यात शंका नाही.
कुसाईवाडी (ता. शिराळा) येथील झालेल्या कुस्ती मैदानातील प्रमुख निकाल खालीलप्रमाणे, पै. अमर पाटील बिळाशी (गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुध्द पै. अक्षय शिंदे शिराळा (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापूर) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
पै. दत्ता बाणकर (चिंचोली) विरुध्द पै. शुभम पाटील (वारणा) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. पै. कर्तार कांबळे (पेरीड) विरुध्द पै. ओंकार जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) या कुस्तीत कर्तार कांबळे विजयी. पै. मयूर जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुध्द पै. राज पाटील (शाहु कुस्ती केंद्र कोल्हापूर) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.
पै. केशव पवार (गंगावेश तालीम कोल्हापूर) विरुध्द पै. प्रदीप पाटील (कणदुर) ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. यावेळी शिराळा तालुक्याचे युवा नेते जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक (पापा), कोकरुड पोलीस स्टेशनचे ज्ञानदेव वाघ, ऑलिम्पिक वीर पै. बंडा पाटील (मामा), यशवंत केसरी पै. राजाराम यमगर, कुस्ती मल्लविद्या महासंघ राज्य उपाध्यक्ष पै. राहुल जाधव, बिळाशी गावचे वस्ताद पै. मारुती पाटील, पै. शिवाजी जाधव रेड, पै. वसंत मोहिते, पै. राजेंद्र साळुंखे, पै. किशोर डिसले, पै. संतोष सातपुते, पै. सुनिल पाटील, डॉ. इंद्रजीत यमगर आदी मान्यवर उपस्थित होते.
कुस्ती मैदानाचे धावते समालोचन कुस्ती निवेदक पै. सुरेश जाधव चिंचोली यांनी केले. सरपंच विनोद पन्हाळकर, उपसरपंच प्रतापराव शिंदे, माजी उपसरपंच भास्करराव पवार, ग्रामपंचायत सदस्य आनंदा भुरके, माजी सरपंच जयवंत मुदगे, रामचंद्र मुदगे, गोरख पवार, जयवंत पवार, शंकर पवार, सुनील पन्हाळकर, बबन पवार, शिवाजी वारंग, अमोल देसाई, संतोष मुदगे, प्रदिप मुदगे,तानाजी मुदगे, उदय पवार आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS