मतदारसंघाशी नाळ घट्ट करण्यासाठी आ. रोहित पवारांकडून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आधार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदारसंघाशी नाळ घट्ट करण्यासाठी आ. रोहित पवारांकडून नावीन्यपूर्ण उपक्रमांचा आधार

कर्जत : जनतेने विश्वास टाकून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जात, धर्म, पैसा अशा अनेक माध्यम

नाटेगावातील शेतकर्‍यांचे उपोषण मागे
मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या | LOKNews24
महागाई विरोधात बहुजन मुक्ती पार्टीचे वाहनांना धक्का मारो आंदोलन
Swarajya Dhvaj | Kharda Jamkhed(स्वराज्य ध्वज ) #shorts #trending  #youtubeshort #fortnite #swaraj - YouTube


कर्जत :
जनतेने विश्वास टाकून निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जात, धर्म, पैसा अशा अनेक माध्यमातून जनमानसातील प्रतिमा टिकवून ठेवण्याचा अनेक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात. आ. रोहित पवार हे मात्र त्यांच्या नवनिर्मित क्षमतेतून कर्जत- जामखेडमधील जनतेसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाबरोबरच विविध अस्मिता जपण्यासाठीच्या मुद्द्यावर काम करत आहेत. त्याचा परिणाम मतदारसंघात दिसू लागला आहे. त्यांचे व्हिजन जनमानसात रुजू लागले आहे.


आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून दसऱ्याच्या दिवशी खर्डा येथील शिवपट्टण किल्ल्यासमोर विक्रमी उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात आला. कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर नेण्याचे काम आ. पवारांनी केले. भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम राज्यात लक्षवेधी ठरला. ऐतिहासिक गड किल्ल्यांची जपणूक करण्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच दिशादर्शक ठरले आहे.


 कर्जत- जामखेडमध्ये असलेल्या ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी अनमोल ठेव्यांकडे अनेकांचे दुर्लक्ष झाले. बहुदा त्यांना त्याचे महत्त्व समजले नसावे. मात्र आमदार रोहित पवार यांनी कर्जत- जामखेडमधील धार्मिक, ऐतिहासिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत होऊ शकणाऱ्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले आहे. फक्त अस्मितेच्या नावाखाली जनतेला भूलविण्याचा त्यांचा उद्देश दिसत नाही. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून बेरोजगारांना रोजगाराच्या संधी आणि गावांना लौकिक प्राप्त करून देण्यासाठी त्यांची धडपड दिसत आहे.


पर्यटन स्थळाचा विकास, त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी तसेच खेडी समृद्ध करण्यासाठी त्यांचे सुरू असलेले प्रयत्न दिशादर्शक ठरत आहेत. कर्जत येथील श्री संत गोदड महाराज, सिद्धटेकचे सिद्धिविनायक, कुळधरणचे जगदंबा देवी अशा अनेक धार्मिक स्थळांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रेहेकुरी काळवीट अभयारण्य विकासासाठी त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. कुंभेफळ येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. त्याच्या विकासाचा आराखडा तयार करून आ. पवारांनी त्यावर लक्ष केंद्रित केले आहे.


कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यातील ऐतिहासिक तसेच पर्यटनस्थळे शोधून त्यावर त्यांनी काम सुरू केलेले आहे. कर्जत- जामखेडमधील पर्यटनस्थळांचे महत्त्व, वैशिष्ट्ये लोकांसमोर येण्यासाठी त्यांनी अभिनेते मिलिंद गुणाजी यांच्या माध्यमातून चित्रीकरण केले. त्याचे अनेक भाग युट्युबवर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे ही स्थळे जगासमोर आणण्याचे मोठे काम झालेले आहे. या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमातून कर्जत- जामखेडशी त्यांची नाळ अधिक घट्ट होताना दिसत आहे.

COMMENTS