शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सत्कार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नवदुर्गाचा सत्कार

अहमदनगर प्रतिनिधी -  या धकाधकीच्या युगामध्ये महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षम पणे सांभाळून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत

अमृतवाहिनी च्या 80 विद्यार्थ्यांची इन्फोसिस व एक्सेन्चर मध्ये निवड
रामनाथ भोजने यांचा वृक्ष मित्र पुरस्काराने सन्मान
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा

अहमदनगर प्रतिनिधी – 

या धकाधकीच्या युगामध्ये महिला आपल्या कुटुंबाची जबाबदारी सक्षम पणे सांभाळून विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवित आहेत.समाजामध्ये त्यांच्या कामाचा त्यांच्या गुणगौरव होणे गरजेचे आहे यासाठी नगर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या नवदुर्गाचा सन्मान सोहळा करण्याचा निर्णय घेण्यात आला 

त्यानुसार नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून प्रत्येक नवदुर्गाच्या घरी व त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.महिलांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे गरजेचे आहे या सत्काराच्या माध्यमातून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जाते असे प्रतिपादन शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष रेश्माताई आठरे यांनी व्यक्त केले.

यावेळी अहमदनगर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तबगार नवदुर्गाँचा सत्कार करण्यात आला यामध्ये सहकार क्षेत्रातील प्रा. मेधा काळे, शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या अनुराधा थिटे,तहसीलदार अम्रूता साबळे,पोलीस कॉन्स्टेबल रविना कांबळे,ॲड.अर्पिता झरकर, डॉ. शालिनी उजागरे, शिक्षिका मीरा बँकिंग क्षेत्रात कार्य करणाऱ्या वर्षा राणा, आरोग्य क्षेत्रातील शर्मिला कदम, बँकेच्या अधिकारी संध्या चव्हाण प्रा.निशा तेलधुने आधी सर्व नवदुर्गा यांचा यावेळी सन्मान व सत्कार करण्यात आला यावेळी महिला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी निर्मना जाधव,वैशाली गुंड,सुनीता पचारने, आलिशा गर्जे,शीतल राऊत,शीतल गाडे,लता गायकवाड, सुरेखा कडूस, सुनंदा कांबळे आदी उपस्थित होते.

COMMENTS