बनावट दारूच्या कारवाईपाठोपाठ बनावट चलनी नोटासह चौकडी अटकेत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बनावट दारूच्या कारवाईपाठोपाठ बनावट चलनी नोटासह चौकडी अटकेत

नाशिक /प्रतिनिधी:- नाशिक ग्रामीण पोलिस हद्दीतील एकापाठोपाठ सलग मोठमोठय़ा कारवायांनी संपूर्ण जिल्हाच हादरून गेल्याचे दृश्य सध्या नाशिक जिल्ह्यामध्य

nashik : पोलिस आयुक्तांनी दिला खांदा
छगन भुजबळांनी फटाके विक्रीवरील बंदी उठवली | Nashik
Nashik : गिरणा धरण ओव्हरफ्लो.. पाच हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू

नाशिक /प्रतिनिधी:-

नाशिक ग्रामीण पोलिस हद्दीतील एकापाठोपाठ सलग मोठमोठय़ा कारवायांनी संपूर्ण जिल्हाच हादरून गेल्याचे दृश्य सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे. चांदोरी येथिल उदयराजे लॉन्स येथे अवैधरीत्या चालू असलेल्या बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त करून जवळपास एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या दुसऱ्याच दिवशी सायखेडा हद्दीत देखील पन्नास लाख रु चा बनावट दारूचा साठा जप्त करीत आरोपींच्या मुसक्या आवळण्यात नाशिक ग्रामीणचे अधीक्षक सचिन पाटील यांना  यश मिळाले  

स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाला देखील अवैधरीत्या सुरू असलेल्या बनावट मद्याचा कारखाना असल्याबाबत माहिती नसावी याबाबत देखील आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा तसेच राज्यभर चर्चा सुरू असतानाच चांदवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार लासलगाव परिसरात काही संशयित बनावट चलनी नोटा व्यवहारात आणणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच त्यांनी तात्काळ सदरचा प्रकार पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना कथन केला. 

पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी तात्काळ लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती सांगून पुढील कारवाईसाठी पथक तयार करून संबंधितांना ताब्यात घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्याने लासलगाव पोलिस ठाण्याचे पथक येवला रोड विंचूर येथे सापळा रचून थांबले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित मोहन बाबुराव पाटील,  प्रतिभा बाबूराव गाव घायाळ दोघे रा. बोराडे हॉस्पिटल जवळ लासलगाव ता. निफाड तसेच विठ्ठल चंपालाल नाघरीया रा. कृषीनगर कोटमगाव रोड लासलगाव ता. निफाड यांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली 

असता त्यांचे नाशिक येथील काही साथीदार हे त्यांना सायंकाळी बनावट चलनी नोटा देणार असल्याचे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांनी सांगितले असता येवला विंचूर रोडवर पोलिसांचे पथक पाळत ठेवून असताना नाशिककडून येणारी संशयित इटिऑस कार एम.एच. ०३ सी. एच. ३७६२ पोलिस पथकांच्या नजरेस पडली व त्यांनी सदरची गाडी अडवून त्यातील संशयित रवींद्र हिरामण राऊत रा. स्मारक नगर पेठ ता. पेठ व विनोद मोहनभाई पटेल रा. चाणक्य बिल्डिंग, ओमकार बंगल्याजवळ, पंचवटी, नाशिक यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या कब्जातून ५०० रुपये मूल्याच्या २९१ बनावट नोटा आढळून आल्या 

असून पोलिस पथकाने संशयितांकडून इटिऑस कारसह बनावट चलनी नोटांचा  ५,४५,५००/- रू किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संपूर्ण टोळीचे जिल्हा व राज्यात तसेच राज्याबाहेरही काही धागेदोरे आहेत का व अशा बनावट नोटा यापूर्वी त्यांनी कुठे चलनात आणल्या आहेत का याबाबत देखील सखोल चौकशी पाेलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव पोलिस करीत आहेत. 

एकापाठोपाठ एक झालेल्या मोठय़ा कारवायांमुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिस विभागाची मलिन झालेली प्रतिमा पुसून टाकण्यात नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यशस्वी होताना दिसून येत आहे याबाबत सर्वसामान्य नागरिकांनी आपण यामुळेच पाेलिस अधीक्षक सचिन पाटील यांची अवेळी झालेल्या बदलीला कडाडून विरोध केला होता रास्तच असल्याच्या या सलग कारवायांमधून निष्पन्न होत आहे. 

COMMENTS