कर्जत प्रतिनिधी माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त 'कर्जत लाईव्ह'च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्
कर्जत प्रतिनिधी
माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कर्जत लाईव्ह’च्या वतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण व कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता कुळधरणच्या श्री जगदंबा मंदिरासमोर डीवायएसपी अण्णासाहेब जाधव व पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या हस्ते हे वितरण होणार आहे. अध्यक्षस्थानी दत्तात्रय सुपेकर हे राहणार आहेत.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेते : प्रथम : प्रियंका विनोद नरसाळे, न्यू इंग्लिश स्कुल, अळसुंदे, द्वितीय : आस्था शिवाजी काळे, डायनॅमिक इंग्लिश स्कूल, कर्जत, तृतीय : मसिरा जाकिर सय्यद, श्री अमरनाथ विद्यालय, कर्जत, उत्तेजनार्थ : संकेत रवींद्र निंबाळकर, श्री रविशंकर विद्यामंदिर, कर्जत.
यावेळी भैरवनाथ कळसकर व रमेश तोरडमल यांच्या वतीने स्व. बायनाबाई कळसकर व स्व. पारूबाई तोरडमल यांच्या स्मरणार्थ कुळधरण, सुपेकरवाडी, चिंचेचे लवण, बोरीचे लवण, गुंडवारे वस्ती, गुंड वस्ती या प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फराळ वाटप करण्यात येणार आहे.
COMMENTS