महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)-  महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्ह्यातील क्रिकेटपटू आरती केदार, अंबिका वाटाडे व श्रेया गडा

दुबळ्या अफगाणिस्तानवर टिम इंडिया बरसली ; रागावलेल्या भारतीयांना दिवाळ भेट दिली !
अफगाणिस्थानात होणार क्रिकेट मालिका… ‘हा’ संघ दौरा करण्याची शक्यता
आनंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : लाखाची बक्षिसे

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या जिल्ह्यातील क्रिकेटपटू आरती केदार, अंबिका वाटाडे व श्रेया गडाख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गौरव करण्यात आला. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते खेळाडूंना बॅट देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव गणेश गोंडाळ, सुमतीलाल कोठारी, वसिम हुंडेकरी, शशिकांत निराळी, अजय कविटकर, कपिल पवार, लकी खुबचंदाणी, योगेश म्हस्के, विनित म्हस्के, सुभाष येवले, नेप्तीचे उपसरपंच संभाजी गडाख, दिलीप गडाख, रावसाहेब होळकर, दत्ता गडाख, मोहन गुंजाळ आदी उपस्थित होते.

आमदार अरुणकाका जगताप म्हणाले की, आजच्या युवती देखील मैदानी खेळाकडे वळत आहे. सर्वच क्षेत्रात महिला आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. क्रिकेटमध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टीने युवती पुढे आल्या आहेत. महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला आहे. अशा खेळाडूंना अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ देण्यात आले आहे. 

लवकरच जिल्ह्यातील एखादी महिला क्रिकेटपटू भारताच्या महिला संघात खेळणार असल्याची आशा त्यांनी व्यक्त केली. प्रा. माणिक विधाते यांनी जिल्ह्यातील गुणवंत महिला क्रिकेटपटूंना भारतीय संघात पाठविण्यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन प्रयत्नशील आहे. यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात आहे. महिला क्रिकेटपटू उत्कृष्ट कामगिरी करीत असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळाडू नक्कीच चमकतील अशी भावना व्यक्त केली.

आरती केदार महाराष्ट्राच्या (खुल्या गटात) संघात खेळत आहे. ती डाव्या हाताची उत्कृष्ट गोलंदाज आहे. उत्तराखंड येथे झालेल्या रणजी स्पर्धेत तिने उत्कृष्ट कामगिरी केली. अंबिका वाटाडे व श्रेया गडाख या दोघींनी 19 वर्षाखालील राज्याच्या क्रिकेट संघात गुजरात येथे झालेल्या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. वाटाडे ही यष्टिरक्षक असून मागील चार वर्षापासून महाराष्ट्राच्या संघात खेळत आहे. तर गडाख ही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे.

COMMENTS