पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसं विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी काही जणांची धडपड

देवळाली प्रवरा प्रतिनिधी                   निवडणूक जवळ आली की

कला सन्मान पुरस्काराने राजेंद्र टाक सन्मानित
वसंत रांधवण यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर
संवत्सर येथील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्रा विषयी मार्गदर्शन

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 

                 निवडणूक जवळ आली की पावसाळ्यात जशा छञ्या उगवतात त्याच प्रमाणे विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करीत असतात.शहरातील एक जण तर शहरात कोणतेही विकास काम केले तरी मीच फेसबुक लाईव्ह केल्यामुळे झाले असल्याची वल्गना करतात. परंतू आपल्यामुळे कोणतेही काम होत नाही.राहुरी फँक्टरी येथिल वैकुंठ भुमीचा गेल्या 20 ते 25 वर्ष प्रश्न भिजत पडला होता.तेव्हा फेसबुक लाईव्हवाल्याला जाग आली नव्हती का.निवडणूक आल्यावरच यांना जनतेचे प्रश्न दिसतात का?असा खरमरीत सवाल लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी केला आहे. 

                राहुरी फँक्टरी येथिल वैकुंठ भुमिचे लोकार्पण सोहळा माजी आ.चंद्रशेखर कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष कदम बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोपानराव शेटे हे होते.यावेळी  उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, मुख्याधिकारी अजित निकत, सोसायटीचे चेअरमन राजेंद्र ढुस, उपाध्यक्ष सुधीर, नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, बाळासाहेब खुरुद, संजय बर्डे, भारत शेटे, अमोल कदम, भीमराज शेटे, नगरसेविका संगीता चव्हाण, सुजाता कदम, नंदा बनकर, कॉन्ट्रॅक्टर सुभाष घोरपडे आदी उपस्थित होते.

      यावेळी बोलताना नगराध्यक्ष कदम म्हणाले की, अनेक वर्षा पासुन प्रलंबित असलेला प्रश्न आज सुटला आहे.20 ते 25 वर्षा पासुन हा प्रश्न भिजत पडला होता.मागिल वेळी राहुरी फँक्टरी येथिल नगराध्यक्ष असताना प्रश्न का सोडला नाही.त्यांचे काय लागेबिबांधे होते.त्यांनी का प्रश्न सोडवला नाही.पाच वर्षात राहुरी फँक्टरी  व देवळाली प्रवरात  दुजाभाव केला नाही.राहिलेल्या रस्त्याचे कामे लवकरच मार्गी लागणार आहे.श्रेय घेण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे.निवडणूक आली की श्रेय घेण्यासाठी कोण कोणते प्रसिद्धी माध्यम वापरतील याचा नेम नाही.पावसाळ्यात जशा छञ्या उगवतात त्याप्रमाणे विकास कामाचे श्रेय घेण्यासाठी धडपड करतात असे कदम यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम म्हणाले, ठेकेदाराकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे.परन्तु देवळाली नगरपालिकेतील ठेकेदार कामाच्या आराखड्यात नसलेले काम सत्ताधाऱ्यांनी सांगितल्यानंतर करून देतात परंतु सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराला तोटा होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरात नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी सर्वाना सोबत घेऊन सर्वाधिक विकास कामे दिली. २० ते २५ वर्षांपासून  जे प्रश्न प्रलंबित होते ते या ५ वर्षाच्या काळात पूर्णत्वास नेले आहे. ही भूषणावह बाब आहे असे ते म्हणाले.

यावेळी भाजप शहराध्यक्ष वसंत कदम, जावेद सय्यद, सुनील विश्वासराव, अनिल येवले आदींनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी, बाळासाहेब खुरुद, संजय बर्डे, भारत शेटे, अमोल कदम, भीमराज शेटे, नगरसेविका संगीता चव्हाण, सुजाता कदम, नंदा बनकर, कॉन्ट्रॅक्टर सुभाष घोरपडे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक मुख्याधिकारी अजित निकत यांनी  केले तर सूत्रसंचालन सुनील गोसावी यांनी तर आभार माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाश संसारे यांनी मांडले.

COMMENTS