श्री जगदंबा देवीच्या भाविकांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री जगदंबा देवीच्या भाविकांना पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचना

कर्जत : प्रतिनिधी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राशीन येथे जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यां

जामखेड शहरात नागरी सुविधांचा बोजवारा
घारगावमध्ये शेकडा ब्रासची रॉयल्टी आणि कोट्यवधींचे उत्खनन
आमच्या जीविताशी खेळू नका… शिक्षक परिषद व शिक्षक संघाची सरकारला आर्त विनवणी, आधी लसीकरण करण्याची मागणी

कर्जत : प्रतिनिधी

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने राशीन येथे जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सूचना दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

त्यांनी म्हटले आहे, राशीनच्या श्री जगदंबा देवीच्या दर्शनाला येणाऱ्या सर्व भाविकांना सूचना आहे की, मंदिरामध्ये आत जाण्याचा आणि बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा आहे. त्यासाठी आपल्या चपला, बूट हे गाडीतच ठेवावेत.

प्रशासनाच्या सुचनेनुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी भाविकांना कोणत्याही प्रकारची वस्तू आतमध्ये नेण्यासाठी परवानगी नाही. हार, फुले, पेढे, गुलाल, नारळ अशा कोणत्याही प्रकारच्या वस्तू घेऊन मंदिरात जाऊ नये. परवानगी नसल्याने प्रवेश मिळणार नाही.

मंदिरामध्ये दर्शन रांगेत चालत असताना बांबू किंवा पाईपला हात लावू नका, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. कोरोना अनुषंगाने सर्व भाविकांनी मास्कचा वापर करावा, विनामास्क परवानगी नाही. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल.

आपली वाहने नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत. अस्ताव्यस्त कुठेही गाड्या उभ्या करू नये. यात्री निवास कंपाऊंडच्या आतमध्ये तसेच नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पार्क करावीत. शासनाने कोरोना संदर्भात घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करावे.

COMMENTS