अहमदनगर महानगरपालिकेच्या मु्ख्य लेखा अधिकाऱ्यास झाला दंड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर महानगरपालिकेच्या मु्ख्य लेखा अधिकाऱ्यास झाला दंड

नेवासा फाटा- प्रतिनिधी अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन मुख्यलेखाअधिकारी श्री दिलीप रघुनाथ झिरपे यांना वेळेत माहिती न पुरविल्यामुळे राज्य महिती आयु

फोफसंडीत विशेष गुणगौरव व काव्यमैफल कार्यक्रम सोहळा उत्साहात
ऋतुराज गडाखांच्या राजकीय भेटी वाढल्या
राज्यात उष्माघाताचे चार बळी

नेवासा फाटा- प्रतिनिधी

अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन मुख्यलेखाअधिकारी श्री दिलीप रघुनाथ झिरपे यांना वेळेत माहिती न पुरविल्यामुळे राज्य महिती आयुक्त, नाशिक खंडपीठ यांनी दि. ६/९/२०२१ रोजी रू५०००/- च्या दंडाची शिक्षा सुनावली असून सदरची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनपाचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता श्री भिकाजी मल्हारी अनाप यांनी श्री झिरपे यांचेकडे दि१६/१०/२०१७ रोजी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत पेन्शनविक्री बाबत माहिती मागीतली होती, 

तथापी सदरची माहिती श्री झिरपे यांनी २वर्ष २ महिने दिली नाही त्यामुळे श्री अनाप यांनी राज्य माहिती आयुक्त यांचेकडे अपिल केले असता खंडपीठाने त्यावर सुनावणी घेवून माहिती न दिल्याप्रकरणी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत श्री झिरपे यांना दोषी ठरवून रू ५०००/- इतक्या रकमेच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे, 

व वसुलीचे आदेश दिलेले आहेत ,यामुळे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती देण्यात टाळाटाळ करणार्या अधिकार्यांवर जरब बसण्यास मदत होणार आहे

COMMENTS