Homeताज्या बातम्यासंपादकीय

न भयं न लज्जा !

काही वर्षापूर्वी शाहरूख खानने एका मुलाखतीत आपल्या पाल्याबद्दल जाहीर भाष्य करतांना, त्याला पाहिजे, त्याने तसे जगावे. त्याला पाहिजे त्या मुलीसोबत सेक्स

भिवंडीत 800 कोटींचे ड्रग्ज जप्त
पुण्यातून 46 लाखाचे अमली पदार्थ जप्त
मुंबईत दीड कोटीचे अमली पदार्थ जप्त


काही वर्षापूर्वी शाहरूख खानने एका मुलाखतीत आपल्या पाल्याबद्दल जाहीर भाष्य करतांना, त्याला पाहिजे, त्याने तसे जगावे. त्याला पाहिजे त्या मुलीसोबत सेक्स करावा, त्याला हवे असेल तर त्याने ड्रग्जचे सेवन करावे, अशी ती मुलाखत होती. यात विनोद किती आणि गांभीर्य किती हे आर्यनच्या अटकेवरून दिसून येते. तसेच ही मुलाखत जुनी असली तरी ती आर्यनच्या अटकेनंतर तंतोतत लागू पडते. यावरून शाहरूखलाच आपल्या पाल्याबद्दल कसलेही सामाजिक भान नाही, आपण पैश्यांच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतो, आणि कायदा पायदळी तुडवू शकतो, असाच त्याचा अविर्भाव होता. तोेेेे अविर्भाव आर्यनच्या अटकेने काहीप्रमाणात नक्कीच तुटला असेल, यात शंका नाही. अलीकडच्या काही वर्षांत अंमलीपदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण मोठया प्रमाणांवर वाढतांना दिसून येत आहे. वास्तविक पाहता हे चंगळवादाचे नवे विश्‍व यानिमित्ताने समोर येत आहे. पायाशी सर्व सोयी-सुविधा लोळण घेत असतांना, उच्चभू्र समाजातील मुले-मुली रेव्ह पार्टी, ड्रग्जचे सेवन आदी प्रकारात गुंतत चालल्याचे समोर येत आहे. वाढत्या व्यसनाधिनतेमागे जीवनशैलीत झालेले बदल, आधुनिकतेचे वारे, पाश्‍चात्य संस्कृतीचा प्रभाव आदी कारणे असून आईवडील आणि मुले यांच्यातील दुर्मिळ होत चाललेला संवाद हेही प्रमुख कारण आहे. मुले काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत, याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. मुलांना वेळोवेळी पॉकेटमनी पुरवून दुर्लक्ष केल्याने मुले एकलकोंडी बनण्याची आणि व्यसनांकडे वळण्याची शक्यता अधिक असते. सुट्टीच्या दिवशी एकत्र जमून क्रिकेट खेळणे अथवा कट्ट्यावर जमून गप्पा मारणे आदी प्रकार बंद होऊन दर विकेंडला एन्जॉयमेंटच्या नावाखाली तरुणाईत ’पार्टी कल्चर’ रुजत आहे. त्यामुळे मुलांच्या साथीने मुलीही अंमली पदार्थाच्या व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत.


शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने अटक केल्यानंतर पुन्हा एकदा बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर येतांना दिसून येत आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या आलिशान क्रूझ सफारीवर श्रीमंत घरची मुले सहभागी असल्याने अमली पदार्थ आणि रेव्ह पार्टीचे आयोजन असल्याचा संशय एनसीबीला आला. एनसीबीने सापळा रचून या क्रूझवर प्रवेश केला आणि त्यांच्याकडू कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त केले. तसेच या मुलांना ताब्यात घेतले. त्यामध्ये बॉलिवूडचा सुपस्टार शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान याचा समावेश असल्याचे समोर आले. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह याने गळफास लावून केलेल्या आत्महत्येनंतर एनसीबीने केलेल्या चौकशीत अनेक बाबी समोर आल्या आहेत. याप्रकरणी अनेक अभिनेत्री-अभिनेते यांची चौकशी देखील झाली आहे. चरस, गांजा, एमडी पावडर आदी अंमली पदार्थ तसेच विविध कफ सिरप, टोल्यून सोल्युशन, बटन्स अर्थात नशेच्या गोळ्या आदींचे सेवन करणार्‍या तरुणाईचा टक्का वाढत आहे. विशेषत: उच्चभ्रू वर्गात व्यसनाधीनतेकडे झुकणार्‍याची संख्या वाढत आहे. अलीकडे कोणते ना कोणते व्यसन असणे, हे ’स्टेट्स सिम्बॉल’ बनल्याने तरुण मंडळी तसेच उच्चभ्रू समाजात व्यसनांकडील ओढा वाढला आहे. व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स वाटते, ताणतणाव कमी होतो, असेही गैरसमज बळावत आहेत. त्यामुळे तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता हा मोठा चिंतेचा विषय बनत आहे. रेव्ह पार्ट्या आणि त्यातील मादक पदार्थांचा वाढता वापर आदी प्रकारामुळे मादक पदार्थांचा व्यापारही वाढीस लागला आहे.

नव्वदच्या दशकात ब्राऊन शुगरसारख्या अंमली पदार्थांची नशा करणार्‍यांचे प्रमाण तुलनेने अधिक होते. मात्र सध्याच्या काळात तरुणाईचा ’डिझायनर ड्रग्स’चे सेवन करण्याकडे ओढा वाढत आहे. एमडी पावडर, टोल्यून सोल्युशन, बटन्स, विविध कफ सिरप आदींची क्रेझ वेगाने वाढत आहे. मात्र नव्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे एमडी पावडरचा ’एनडीपीएस’मध्ये (नार्कोटिक्स ड्रग्ज अ‍ॅण्ड सायकोट्रॉपिक अ‍ॅक्ट) समावेश झाल्याने संबंधित आरोपीला जामीन मिळत नाही. तसेच कलमान्वये किमान 10 ते 15 वर्षांच्या शिक्षेचीही तरतूद आल्याने एमडी पावडरच्या सेवन आणि साठ्यावर बहुतांश ठिकाणी प्रतिबंध आला आहे. मात्र उच्चभू्र समाजात याचे सेवन सातत्याने वाढत चालले आहे. अभिनेते-अभिनेत्रीचे मुलेच यात अडकत नाही तर अनेक अभिनेते आणि अभिनेत्री देखील याचे सेवन करतांना आढळून आले आहेत. त्यांच्यावर याप्रकरणी कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला आहे. त्यामुळे शाहरूखचा मुलगा आर्यन खान याने, रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन करण्याच्या इराद्यानेच जात असल्याचे त्याच्या मोबाईलच्या व्हॉटस अ‍ॅप चॅटवरून समोर आले आहे. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेटचा समावेश असल्याची शक्यता देखील एनसीबीने वर्तवली आहे. मात्र याची कोणतीच पूर्वकल्पना शाहरूख खाना किंवा त्याची आई गौरी खानला नसेल, असे नाही. मात्र मुलांना सर्व सोयी-सुविधा पुरवत असतांना आपण त्यांना सामाजिक भान द्यायला विसरलो, याची जाणीव या सुजाण पालकांना नसणे, मूर्खपणाचे आहे. उच्चभू्र समाजात ही वाढत असलेली व्यसनाची दरी, हळूहळू मध्यमवर्गींयाकडे सरकतांना दिसून येत आहे. त्यामुळे यातून सावरणे कठीण असले तरी अवघड नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यासोबत वाढवणे गरजेचे आहे.

COMMENTS