Sangamner :संगमनेर खुर्द मध्ये 9 लाख रुपयांचा 40 किलो गांजा जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner :संगमनेर खुर्द मध्ये 9 लाख रुपयांचा 40 किलो गांजा जप्त

संगमनेर शहरानजीक असलेल्या संगमनेर खुर्द येथील वर्पे वस्ती या ठिकाणी नऊ लाख तीस हजार नऊशे दहा रुपये किमतीचा 46 किलो 425 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आ

Sangamner : कोरोना लसीकरणाबाबत प्रबोधनात्मक जनजागृती | LokNews24
रोटरी क्लबतर्फे करणार कमर्शिअल चक्की वाटप
संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन

संगमनेर शहरानजीक असलेल्या संगमनेर खुर्द येथील वर्पे वस्ती या ठिकाणी नऊ लाख तीस हजार नऊशे दहा रुपये किमतीचा 46 किलो 425 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई संगमनेर शहर पोलिसांनी शुक्रवारी केली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संगमनेर खुर्द या ठिकाणी असलेल्या सीमा राजू पंचारिया हिने तिच्या घरात बेकायदेशीररित्या नऊ लाख रुपयांचा गांजा साठवून ठेवला असल्याची माहिती गुप्त खात्यामार्फत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली होती. माहिती समजताच त्यांनी व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री सव्वा 11 वाजेच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला .या छाप्यामध्ये नऊ लाख तीस हजार नऊशे दहा रुपये किमतीचा 46 किलो 425 ग्रॅम गांजा मिळुन आला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सीमा राजू पंचारिया व राजू पंचारिया पूर्ण नाव माहीत नाही या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही त्या ठिकानाहून उत्पादन झाले आहेत. पुढील तपास संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहे. दरम्यान यापूर्वीही नगर या ठिकाणी पंचारिया गांजाची अवैध विक्री करताना नगर पोलिसांच्या हाती लागले होते. याबाबत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

COMMENTS