राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची श्री विशाल गणेश मंदिराला भेट

Homeताज्या बातम्याअहमदनगर

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची श्री विशाल गणेश मंदिराला भेट

नगर : प्रतिनिधी  श्रीगणेशाच्या आशिर्वादाने राज्यातील आघाडी सरकार हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेली परि

युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची नियुक्ती
LOK News 24 I दखल ; तीन विचारधारेचे सरकार टिकणार ?
शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई महावितरणने थांबवली

नगर : प्रतिनिधी 

श्रीगणेशाच्या आशिर्वादाने राज्यातील आघाडी सरकार हे चांगल्या पद्धतीने काम करत आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने हातळली आहे. या काळात सर्वसामान्यांना दिलासा दायक निर्णय घेऊन हे सरकार जनतेचे आहे हे दाखवून दिले आहे. आता कोरोना प्रादुर्भाव कमी होत असतांना अर्थचक्रही पुर्वपदावर येत आहे. जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे, ही भावना ठेवून काम सुरु आहे. नगर शहराचे ग्रामदैवत असलेले श्री विशाल गणेश मंदिरातील श्री गणेशाची मुर्ती नावाप्रमाणेच विशाल व प्रसन्न अशी असे. या ठिकाणी प्रसन्न व समाधान वाटत आहे. मंदिराचे झालेले काम हे अतिशय सुबक व कोरीव असून, त्यामुळे मंदिराच्या लौकिकात भर पडत आहे. पावन श्री विशाल म्हणून असलेली ख्यातीची प्रचित यानिमित्त येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरला भेट दिली असता त्यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, सचिव अशोकराव कानडे, विश्वस्त विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, गजानन ससाणे, रेश्मा आठरे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, देणगीदार व भाविकांच्या सहभागातून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून, महाराष्ट्रातील एक जागृत देवस्थान म्हणून श्री विशाल गणेशाची प्रचिती आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून मंदिरे बंद होती, आता राज्य शासनाने पुढील आठवड्यात मंदिरे उघडण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, असे सांगितले.

यावेळी सचिव अशोकराव कानडे यांनी मंदिराच्या झालेल्या कामाची माहिती दिली. विजय कोथिंबीरे यांनी आभार मानले.

COMMENTS