नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नितीन गडकरी व शरद पवार येणार एकाच मंचावर.. ४ हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ

अहमदनगर प्रतिनिधी -  अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण २ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. नगर शहराजवळ

माणसाने विनोदी असणं हे जिवंत पणाचे लक्षण; डॉ मिर्झा रफी अहमद बेग
देहराडूनच्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
LOK News 24 ।सचिनसाठी शोएब अख्तरने अल्लाहकडे मागितली दुवा

अहमदनगर प्रतिनिधी – 

अहमदनगर जिल्ह्यातील विविध चार महामार्गांचे भूमिपूजन आणि चार महामार्गांचे लोकार्पण २ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. नगर शहराजवळ केडगाव परिसरात शनिवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी पवार आणि गडकरी एकत्र येत आहेत.

नगर शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी यासंबंधीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुमारे चार हजार कोटी रुपये खर्चांची महामार्गांची कामे मंजूर झालेली आहेत. त्यांचे भूमिपूजन या दिवशी होणार आहे. यामध्ये नगर-करमाळा हा महामार्गा चार पदरी होणार आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. सावळीविहिर ते नगर बायपास रुंदीकरण, नगर-भिंगार रस्ता रुंदीकरण यासह राष्ट्रीय राखीव निधीतून दुरूस्तीच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात येणार आहे. याशिवाय नगर-दौंड, नगर- कडा- जामखेड, कोपरगाव वैजापूर अशा काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचे औपचारिक उद्घाटनही यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत, असेही गंधे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे पदाधिकारी सुनील रामदासी, सचिन पारखी, संतोष गांधी, नरेंद्र कुलकर्णी, विवेक नाईक उपस्थित होते.

COMMENTS