Homeताज्या बातम्याअहमदनगर

अमृतवाहिनी च्या 80 विद्यार्थ्यांची इन्फोसिस व एक्सेन्चर मध्ये निवड

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इन्फोसिस व एक्सेन्चर या बहुराष्ट्रीय व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षे

सरकारचं दोन वर्षाचं काम लई भारी : लोककला पथकांचा जागर सुरू
केंद्र शासनाने साखर निर्यातीचा निर्णय घ्यावा ः आमदार आशुतोष काळे
नगरच्या उपनगरांची भुयारी गटार योजना अडकली वादात


अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इन्फोसिस व एक्सेन्चर या बहुराष्ट्रीय व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांमध्ये 51 व 29 विद्यार्थी मिळून एकूण 80 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती  प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश   यांनी दिली आहे        अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या विश्वस्त मा. शरयूताई देशमुख यांनी खासकरून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सर्वाना यशस्वी करीअरच्या शुभेच्छा दिल्या.या वेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, उपप्राचार्य प्रा. ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा.व्ही. पी. वाघे, ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. बी. एस. साबळे, डॉ. आर. एस. ताजणे, सर्व शिक्षक समन्वयक आणि विद्यार्थी उपस्थित होते.   

   यावेळी प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश म्हणाले,“कोविड-19 च्या परिस्थितीमध्येही सन 2020-21 या शैक्षणिक वर्षी एकूण 317 विद्यार्थ्यांची प्लेसमेंट झालेली आहे. त्यातील काही विद्यार्थी याअगोदरच कंपनीत रुजू झाले असून बाकी दिवाळीपर्यंत रुजू होणार आहेत. कंपनीमध्ये प्रथमतः प्रशिक्षण दिले जाणार असून या दोन्ही कंपनीमधील मनुष्यबळ अधिकार्यांनी विद्यार्थ्यांच्या उत्तम सादरीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले आहे ” 


     इन्फोसिस ही नावीन्यपूर्ण आणि आधुनिक डिजिटल सेवा देणारी व कन्सल्टन्सी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून 50 पेक्षा जास्त देशातील ग्राहकांना चार दशकांहून अधिक अनुभवासह सेवा देण्यास तत्पर आहे. तसेच कुशल मनुष्यबळावर सतत प्रशिक्षण देऊन डिजिटल कौशल्य वृद्धिंगत करण्यास ही कंपनी तयार असते. तसेच एक्सेन्चर ही कंपनी आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी असून आर्टीफ़िसिअल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन, क्लाऊड काम्प्युटिंग या मुख्य प्रवाहात काम करणारी कंपनी आहे. या दोन्ही कंपन्या महाविद्यालयास दरवर्षी कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सर्व विभागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असतात.  

     अमृतवाहिनी महाविद्यालयात कंपनीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमधील प्रशिक्षण वर्ग कोविड-19 मुळे ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली जातात. करियर डेवलपमेंट सेलची टीम कंपनीच्या मानव संशोधन व विकास विभागाशी सतत संपर्कात राहून आगामी कालखंडात कोणत्या तंत्रज्ञानाची गरज असणार आहे याची माहिती करून घेतात. त्यानुसार नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानातील कोर्सचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी सराव, चर्चासत्र, इंटरव्ह्यूची तयारी करून घेतली जाते. या कंपन्यांमध्ये अमृतवाहिनीचे माजी विद्यार्थी उच्च पदावर काम करत असल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन सतत मिळत असून प्लेसमेंटमध्ये त्याचा फायदा होत आहे.    

   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच उद्दिष्ट ठेवून महाविद्यालयाचे व्यवस्थापन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सतत तत्पर आहेत. विद्यार्थ्यांना सातत्याने जगातील नामवंत कंपन्यांमध्ये प्लेसमेंट उपलब्ध करून दिल्याने शैक्षणिक क्षेत्रात अमृतवाहिनी संस्था ही विद्यार्थी आणि पालकांच्या पसंतीस नेहमीच पात्र ठरत आहे. अमृतवाहिनी मधून आज हजारो विद्यार्थी जगातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्टार्ट-अप व्यवसाय सुरू करून रोजगार उपलब्ध केले आहेत.  

  विद्यार्थ्यंच्या या यशाबद्दल  महाराष्ट्र राज्याचे विद्यमान महसूलमंत्री मा. नामदार बाळासाहेब थोरात, आ. डॉ. सुधीरजी तांबे, मा.इंद्रजीतभाऊ थोरात यांच्याकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS