पंजाबात होणार राजकीय उलथापालथ… काँग्रेसचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

Homeताज्या बातम्यादेश

पंजाबात होणार राजकीय उलथापालथ… काँग्रेसचा बडा नेता घेणार अमित शहांची भेट

प्रतिनिधी : दिल्ली अमरिंदर सिंग हे आज सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील.&nb

कॉपी करताना पकडल्यानंतर विद्यार्थिनीने केली आत्महत्या
पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरांत लवकरच दिलासा
येरवडा परिसरामध्ये एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक 

प्रतिनिधी : दिल्ली

अमरिंदर सिंग हे आज सायंकाळी ४.३० वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. 

हा काँग्रेससाठी मोठा धक्का असून भाजपच्या मुख्यालयात राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. अमरिंदर सिंगांबरोबर त्यांचे समर्थक आमदारही भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. 

यामुळे पंजाबमध्ये मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

दरम्यान एकीकडे काँग्रेसमध्ये आज जिग्नेश मेवानी आणि कन्हैय्या कुमार प्रवेश करणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे . 

तर दुसरीकडे पंजाबमधील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसची डोकेदुखीही वाढली आहे .

देशात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. 

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळे अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पद सोडावे लागले.कॅप्टन अमरिंदर याच कारणाने कँग्रेस नेतृत्वावर नाराज असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या .

COMMENTS