अहमदनगर : प्रतिनिधी दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातील कुस्ती खेळकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासन दिवसेंदिवस कुस्ती कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.
अहमदनगर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस क्रीडा क्षेत्रातील कुस्ती खेळकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शासन दिवसेंदिवस कुस्ती कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रने कुस्ती क्षेत्राला नावलौकिक मिळवून दिला आहे. कुस्ती क्षेत्रामुळे अनेक पैलवान घडले आहे. या शहराने आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन नगर शहराचे नाव मोठे केले आहे. कुस्ती क्षेत्राला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रोत्साहन देण्याची खरी गरज आहे. असे प्रतिपादन पैलवान संभाजीराव लोंढे यांनी केले.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व पैलवान विशाल गव्हाणे यांचा सत्कार करताना पैलवान संभाजीराव लोंढे. समवेत अभय दातरंगे. आकाश कुलकर्णी. विक्रम बेरड. सुनील आबनावे. सोनू गीते. गोविंद शिंदे. शेखर गोंधळे आदी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना चंद्रहार पाटील म्हणाले की कमी वयामध्ये नगर शहरामध्ये पहिली महापौर केसरीकिताबाचा मान मला मिळाला त्यामुळे कुस्ती क्षेत्रांमध्ये अधिक जिद्द चिकाटी व मेहनतीने सराव केला. व डबल महाराष्ट्र केसरीचा किताब मला मिळाला. यामध्ये नगर शहराचे योगदान मोठे आहे. लोंढे कुटुंबांचे कुस्ती क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. मल्ल घडवण्यासाठी त्यांचे सहकार्य असते असे ते म्हणाले.
COMMENTS