राज्यसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा… भाजपची माघार

Homeताज्या बातम्यादेश

राज्यसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा मार्ग मोकळा… भाजपची माघार

प्रतिनिधी : मुंबई काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्

शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्येl LokNews24
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक
महानगरपालिकेवर काँग्रेसचा भव्य आसूड मोर्चा

प्रतिनिधी : मुंबई

काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर राज्यसभेची पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती काँग्रेसने फडणवीस यांच्याकडे केली होती. 

आता काँग्रेसची विनंती भाजपाने मान्य केली. भाजपाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 

काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. काही वेळात ते उमेदवारी माघारी घेणार आहेत.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. 

यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. फडणवीस यांची भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती काँग्रेस नेत्यांनी केली होती. 

मात्र, आता भाजपाने त्यांची विनंती मान्य केली आहे. भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांचा अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविली आहे. आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे.

राज्यसभा निवडणूक महाराष्ट्र, तामिळना़डू, पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्यप्रदेशातील रिक्त जागांवर होणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर होती.

 तर ४ ऑक्टोबरला मतदान होऊन निकाल जाहीर होईल. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, आसाम, मध्यप्रदेशमधील एका जागेवर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर, तामिळनाडूमधील दोन जागांवर निवडणूक पार पडेल.

COMMENTS